सर्वाधिक वेगाने धावणारी बुलेट ट्रेन असणाऱ्या चीनमध्ये प्रवासी नसल्याने स्टेशन बंद करण्याची वेळ आली आहे.
चीनने मालदीवला दीड हजार टन पाण्याची दुसरी खेप रवाना केली आहे. दोन महिन्यांच्या आत ही दुसरी मदत चीनने मालदीवला केली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देशात सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे. 4 जुलै रोजी निवडणुका होतील.
कोलंबिया या देशाने पॅलेस्टाईनच्या शहरात दूतावास सुरू करण्याची घोषणा केली आहे. इस्त्रायलसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
बंदूकधाऱ्यांनी नायजेरियातील जुराक आणि डाकाई या गावांमध्ये गोळीबार केला आणि घरांना आग लावली. यात ४० लोकांचा मृत्यू झाला.
इराण सरकारने राष्ट्रपती निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निर्णयानुसार येत्या २८ जून रोजी निवडणूक होणार आहे.
विमान आणि हेलिकॉप्टरच्या अपघातात याआधीही अनेक नेत्यांनी आपला जीव गमावला आहे. जगातील या विमान अपघातांची आजही चर्चा होत असते.
ऑस्कर पुरस्कार सोहळा सर्वात आधी 16 मे 1929 रोजी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये फक्त 270 लोक सहभागी झाले होते.
किर्गीस्तानी आणि विदेशी विद्यार्थ्यांत कोणत्या तरी किरकोळ कारणावरून धुमश्चक्री उडाली. या हाणामारीत किर्गीस्तानींच्या साथीला इजिप्तचेही काही विद्यार्थी होते.
पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांना लवकरच एक पत्र लिहिणार असल्याची घोषणा इम्रान खान यांनी केली आहे.