शिवसेनेचा बाप मीच, कारण…; भाजप आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान, शिंदे गट आक्रमक

शिवसेनेचा बाप मीच, कारण…; भाजप आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान, शिंदे गट आक्रमक

Parinay Fuke : भंडाऱ्यामधील एका कार्यक्रमात भाजप आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी मीच शिवसेनेचा (ShivSena) बाप आहे, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीत (Mahayuti) वादाची ठिणगी पडली आहे. परिणय फुके यांनी १२ तासांच्या आत जाहीरपणे माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, अशा इशारा शिंदे गटाने दिला. त्यामुळं चांगलाच वाद होण्याची शक्यता आहे.

दिल्लीच्या VIP भागात खासदारच असुरक्षित, महिला खासदाराची सोनसाखळी हिसकावली, आर सुधांचे थेट गृहमंत्र्याना पत्र.. 

परिणय फुके भंडाऱ्यामधील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, काही लोकांनी माझ्यावर आरोप केले. पण, मी शांत बसो. मी कोणत्याही आरोपांना उत्तर देत नाही. पण त्या दिवशी मला जाणवलं की, तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कुणी केलं? समजा पोरगा दहावीत पास झाला, चांगले मार्क मिळाले तर कोणी केलं पोराने केलं, किंवा आईनं केलं म्हणतात. उलट, काही खराब झालं तर हे बापाने केलं म्हणतात. दोष बापावर टाकला जातो. म्हणून मला पक्कं माहित आहे की, मी शिवसेना बाप आहे, कारण ते माझ्यावर खापर फोडत आहेत, असं ते म्हणाले.

अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पतीला संपवण्याचा प्लॅन फसला; वाचा, नक्की काय घडलं? 

१२ तासांच्या आत जाहीर माफी मागा
फुके यांच्या विधानानंतर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. शिंदे गटाचे लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे पिता आहेत. कोणीही आमचा बाप होण्याचा प्रयत्न करू नये. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश मालगावे यांना पराभूत करण्याचे काम केलं, त्यांनीच काँग्रेस उमेदवाराला सहा मते देण्याचा डाव खेळला. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. आता फुके यांनी शिवसेनेबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याने कार्यकर्ते दुखावले आहेत. फुके यांनी १२ तासांच्या आत जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ठाकरे गट काय म्हणाला?
फुकेचा बाप कोण हे देवेंद्र फडणवीसांना विचारलं पाहिजे, असं अरविंद सामंत म्हणाले. तर फुके तो फुकेच. काहीही बोलतो. याची बायको दोन मुलांना घेऊन लोकांच्या दारात फिरते, आधी त्यांचा बाप हो, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube