जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर, CM फडणवीसांची मोठी घोषणा
Jalgaon Express Accident : जळगावमधील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ पुष्पक एक्सप्रेसला (Pushpak Express) आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांनी धावत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजूने वेगात येत असलेल्या बंगळुरू एक्सप्रेसने (Bangalore Express) या प्रवाशांना चिरडल्यावे वृत्त आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
IND vs ENG Live: भारताच्या प्लेइंग 11 मधून शमीचा ‘पत्ता कट’, कर्णधार सूर्या नेमकं काय म्हणाला?
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. फडणवीस म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जवळील एका दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2025
फडणवीस यांनी पुढं म्हटलं की, माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले आहेत. जिल्हाधिकारी देखील लवकरच तिथे पोहोचतील. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून काम करत आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी तात्काळ व्यवस्था केली जात आहे. ८ रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. जखमींवर उपचार करण्यासाठी सामान्य रुग्णालयासोबतच जवळील इतर खाजगी रुग्णालयेही सज्ज ठेवण्यात आली. आम्ही संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे, असंही फडणवीसांनी लिहिलं.
IND vs ENG Live: भारताच्या प्लेइंग 11 मधून शमीचा ‘पत्ता कट’, कर्णधार सूर्या नेमकं काय म्हणाला?
जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल.
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.#jalgaon pic.twitter.com/NHTUr1JTqw— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2025
जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, अशी घोषणाही फडणवीसांनी केली. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो, असंही फडणवीस म्हणाले.
कसा झाला अपघात?
पुष्पक एक्सप्रेस जळगावहून निघाली होती, ही ट्रेन परांडा स्टेशनजवळ आली असता ब्रेक दाबल्यानंतर घर्षण झालं आणि काही ठिणग्या उडल्या. या पाहून एका प्रवाशाने आग लागली, आग लागली असं सांगण्यास सुरूवात केली. या अफवेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि भीतीपोटी अनेकांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. जवळपास ३५ ते ४० प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. मात्र, त्याच वेळी, दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बेंगळुरू एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडले. या अपघातात उड्या मारणारे प्रवाशी ठार झाला.
अपघातात किती जणांचा मृत्यू…
जळगावचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे आणि पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना पाचोरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.