जळगाव रेल्वे दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा; रामदास आठवलेंची मागणी

  • Written By: Published:
जळगाव रेल्वे दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा; रामदास आठवलेंची मागणी

मुंबई : जळगावहुन मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला (Pushpak Express) आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसच्या (Bangalore Express) खाली चिरडल्यामुळे या प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला. जळगावमधील परधाडे स्टेशनजवळ हा भीषण अपघात घडला आहे. हा अपघात अत्यंत धक्कादायक असून या अपघाताची सखोल चौकशी करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्रात 3 लाख रोजगाराच्या संधी, CM फडणवीसांनी केला रिलायन्ससोबत 3 लाख कोटींचा करार 

आठवले म्हणाले की, हा रेल्वे अपघात अत्यंत भीषण असून हृदयद्रावक आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची मनशक्ती प्राप्त होवो. मृतांच्या कुटुंबियांना सरकारने सांत्वनपर निधी द्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ होत असून केवळ एका अफवेनं घात गेला अन् क्षणात १० प्रवाशांच्या कुटुंबीयांवर मोठं दु:ख कोसळलं आहे. प्रवशांचा गेलेला जीव पुन्हा येऊ शकत नाही. हा अपघात अत्यंत दुःखद आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना रेल्वे मंत्रालयाने सांत्वनपर निधी द्यावा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, असे अपघात पुन्हा होऊ नयेत यासाठी रेल्वे प्रशासनने खबरदारी घ्यावी आणि प्रवाशांनी ही दक्ष असावे, असं आठवले म्हणाले.

अभिषेकची ‘तुफानी’ खेळी, पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा शानदार विजय 

या भीषण अपघाताची पहिली माहिती या रेल्वेत प्रवास करणारे रिपब्लिकन कार्यकर्ते संदीप जाधव यांनी आपल्याला दिली आल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

फडणवीसांकडून मृतांना 5 लाखांची मदत जाहीर
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. फडणवीस म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जवळील एका दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, अशी घोषणाही फडणवीसांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube