एका दिवसात किती प्रमाणात गोड पदार्थ खावेत? शरीराला किती साखरेची गरज? जाणून घ्या…

एका दिवसात किती प्रमाणात गोड पदार्थ खावेत? शरीराला किती साखरेची गरज? जाणून घ्या…

How Much Sugar Eat Everyday What Is Limit : आपल्याकडे सकाळ, दुपार अन् संध्याकाळ अशा कोणत्याही वेळचं जेवण असो, ते गोड (Sugar) पदार्थाशिवाय अपूर्णच असतं. सकाळची झोप देखील चहा किंवा कॉफीने सुरू होते. झोपण्याची वेळ एक ग्लास दुधाने (Health Tips) असते. या दरम्यान एखादी गोड बातमी कळली तर? एकमेकांना गोड खाऊ न घालता कसं बरं चालणार? परंतु हीच साखर आपल्या आरोग्यासाठी (How Much Sugar Eat Everyday) अत्यंत धोकादायक आहे.

आपल्या आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये, म्हणून किती गोड पदार्थ खावेत हे आज आपण जाणून घेऊ या. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, साखर आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. अशा परिस्थितीत गोड खाण्यासोबतच, आपल्या शरीरासाठी किती साखरेचे सेवन करणे योग्य आहे? हे आपण जाणून घेऊ या.

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! औषधी अन् सुगंधी वनस्पतींची लागवड करा बिनधास्त; ‘या’ ठिकाणी करा अर्ज

रोज किती प्रमाणात गोड खायचं?

अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) नुसार, पुरुषांनी दररोज 9 चमचे (36 ग्रॅम) पेक्षा जास्त साखरेचे सेवन करू नये. तर महिलांनी 6 चमचे (25 ग्रॅम) पेक्षा जास्त साखरेचे सेवन करू नये. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, एका सामान्य प्रौढ व्यक्तीने दररोज 25 ग्रॅम (सुमारे 6 चमचे) पेक्षा जास्त साखरेचे सेवन करू नये.

साखरेबद्दल सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याचे दुष्परिणाम शरीरात हळूहळू दिसून येतात. जेव्हा आपल्याला कळते, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. जास्त साखर खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. शिवाय मधुमेह आणि फॅटी लिव्हर सारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.

11 वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरु पण पहिल्या दिवशी वेबसाईट ठप्प, विद्यार्थांचा उडाला गोंधळ

जास्त गोड खाण्याचे परिणाम :

वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, जास्त भूक लागणे, वजन कमी होणे, थकवा येणे, अंधुक दृष्टी येणे, जखमा बऱ्या होण्यास उशीर होणे, त्वचेचा संसर्ग, शरीराचा थरकाप, घाम येणे, हृदयाचे ठोके वाढणे, मिशांमध्ये खाज सुटणे, गुप्तांगांमध्ये खाज सुटणे आणि संसर्ग होणे ही साखर वाढल्याची लक्षणे आहेत.

जर साखर अनियंत्रित झाली तर हृदयरोग, मूत्रपिंडाचे आजार, डोळ्यांचे आजार, मज्जातंतूंचे नुकसान, पचन समस्या, वजन वाढणे, ऊर्जेचा अभाव, लैंगिक समस्या, सांधेदुखी, झोपेच्या समस्या, ताणतणाव, नैराश्य इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube