राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा जाणार? निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी आता राष्ट्रवादीवर

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा जाणार? निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी आता राष्ट्रवादीवर

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने झटका दिल्यानंतर आता आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे केंद्रीय निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थितीचा आढावा घेणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

एकजुटीने समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू, ‘गुढी’ उभारत अजितदादांच्या शुभेच्छा…

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर निवडणूक आयोग राष्ट्रवादीचाही आढावा घेणार, या बातमीनंतर एकच खळबळ उडालीय. निवडणूक आयोगाच्या आयोगाच्या आढाव्यानंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा संपुष्टात येण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचं दिसतंय.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी राष्ट्रवादीकडून कोणत्याही अटी व नियमांचं पालन न केल्याची माहितीही समोर आली आहे. याचीच समीक्षा निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार असून राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा जाणार असल्याची भीती 2014 पासून आहे. मात्र, त्यावेळी निवडणूक आयोगाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानंतर आता पक्षाच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

तेजस ठाकरे यांचे बॅनर! उद्धव यांचा दुसरा मुलगा राजकारणात उतरण्याची तयारीत?

निवडणूक आयोगाकडून आढावा घेतल्यानंतर पक्षाचा राष्ट्रीय दर्जाचा काढून घेतला जातो की काय? अशी भीती बाळगण्यात येत आहे. त्यासोबतच बहुजन समाज पार्टी आणि सीपीआयचाही दर्जा काढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, 1999 साली राष्ट्रावादी काँग्रेसची स्थापना काँग्रेमधून बाहेर पडलेले शरद पवार यांनी केली. सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्यानंतर शरद पवारांनी आपली वेगळी चूल मांडली होती. त्यांच्यासोबत पी. ए. संगमा आणि तारेक अन्वर यांनीही शरद पवारांना साथ दिली होती.

आता निवडणूक आयोगाच्या आढाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात येईल काय? हा प्रश्न सर्वांनाच पडला असून आढाव्यानंतर निवडणूक आयोगाकडून नेमकी कोणती भूमिका घेण्यात येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube