- Letsupp »
- uncategorized
Uncategorized
-
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 484 पदांसाठी भरती, १० ऑक्टोंबरपर्यंत करता येणार अर्ज
ECIL Recruitment 2023: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) अंतर्गत अप्रेंटिस (apprentice) पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत एकूण 484 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमदेवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2023 […]
-
धनगर आरक्षणाबाबत भाजपच्या आदिवासी मंत्र्यांचे मोठे विधान; सरकारची होणार कोंडी?
नंदुरबारः मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी आंदोलने झाली आहेत. त्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये (एसटी) मध्ये आरक्षण देण्याची मागणी राज्यातून होत आहे. या आरक्षणासाठी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सरकारकडून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. धनगर समाजाला (Dhangar Reservation) अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास आदिवासी […]
-
World Cup 2023 : पाकिस्तानचा संघ ठरला; कोणाला मिळाली संधी? जाणून घ्या…
World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून(PCB) पाकिस्तान संघाची(Pakistan Team) घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह(Nasim Shah) दुखापत झाल्याच्या कारणामुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर होता, नसीम शाहच्या जागी हसन अलीचा(Hussan Ali) समावेश करण्यात आला होता. ‘त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाहीच; नार्वेकरांच्या खेळीवर ठाकरेंचे खासदार भडकले पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), […]
-
Turkey : ‘काश्मीरचा प्रश्न सोडवा’; तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचं संयुक्त राष्ट्रात मोठं विधान…
Turkey : भारत-कॅनडामध्ये(India-Canada) तणावाची परिस्थिती असताना आणखी एका देशाने भारतावविरोधात हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत तुर्कीचे(Turkey) राष्ट्राध्यक्ष रेसेप तेय्यप एर्दोगन(Recep Tayyip Erdoğan) यांनी जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावरुन भारताविरोधात आवाज उठवल्याचं समोर आलं आहे. जम्मू-काश्मीरबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. Canada News : हा तर निर्लज्ज अन् वेडगळपणा; अमेरिकेतील तज्ज्ञांनी ट्रुडोंना फटकारलं जम्मू-काश्मीवरुन भारत आणि […]
-
आपण काहीतरी पाप केलयं; राऊतांनी सांगितली अजितदादांच्या मनातली सल
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत फारकत घेत शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदर संजय राऊत (Sanjay Raut) नेहमी टीका करत असतात. मात्र, यावेळी त्यांनी अजितदादांना आतल्या आत खुपणारी गोष्ट सांगितली आहे. आपण काही तरी पाप केलंय, गुन्हा केलाय अशी सल अजित पवारांच्या मनात असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. ते […]
-
UNSC मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी भारताचा दावा मजबूत, G-20 साठी आलेल्या नेत्यांचा पाठिंबा
G20 Summit 2023 : भारताच्या अध्यक्षतेखाली G-20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन झाल्यामुळे UNSC मध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे. G-20 च्या बैठकीनंतर आणि नवी दिल्ली घोषणेला एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर जगातील सर्वोच्च नेत्यांनी भारताचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी आणि ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी UNSC च्या विस्तारावर आणि सुधारणांवर भर दिला, तर तुर्कीच्या राष्ट्रपतींनी UNSC मध्ये भारताच्या […]









