भारताच्या हल्ल्यापूर्वीच निसर्गाचा पाकिस्तानला ‘दे धक्का’; 4.2 रिश्टर स्केल भूकंपानं जमीन हादरली

Earthquake With Magnitude Of 4.2 Richter Scale Hit Pakistan : पहलगामध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव प्रचंड वाढलाय. भारत पाकिस्तानवर (Pakistan) कधीही हल्ला करू शकतो, अशी परिस्थिती आहे. अशातच पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आली. पाकिस्तानमध्ये 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.
An earthquake with a magnitude of 4.2 on the Richter Scale hit Pakistan at 16:00:05 (IST) today: National Center for Seismology (NCS) pic.twitter.com/KCEHhJWPoG
— ANI (@ANI) May 5, 2025
पाकिस्तानमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. भारतीय वेळेनुसार दुपारी 4 वाजता पाकिस्तानमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. एकाच आठवड्यामध्ये झालेला हा दुसरा भूकंप आहे. खैबर पख्तूनवा येथे या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र याच भागात असल्याचे सांगितले जातंय. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार, या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होते.
दरम्यान, या भूकंपामुळे कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही, असं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सांगितलं. यापूर्वी देखील 30 एप्रिल रोजी 4.4 तीव्रतेचा आणि 12 एप्रिल 2025 ला 5.8 तीव्रतेचा भूकंप पाकिस्तानात झाला होता.
कॉंग्रेसचा कार्यकर्ता अस्वस्थ, केवळ नॅरेटीव्हवर काम करून पक्ष वाढत नाही; बावनकुळेंचा हल्लाबोल
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. हल्ल्यानंतर भारताने सहा मोठे निर्णय घेतले. त्यातील महत्वाचा निर्णय म्हणजे, सिंधू पाणीवाटप करार स्थगित करण्यात आला. दुसरा मोठा निर्णय म्हणजे अटारी सीमा बंद करण्यात आली आहे. याशिवाय, आयात-निर्यात पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. टपाल सेवा देखील बंद करण्यता आली. अनेक पाकिस्तानी चॅनेलही बंद करण्यात आले आहेत.
पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या
दरम्यान, दुसरीकडे भारत हल्ला करू शकतो, या भीतीनं पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या. पाकिस्तानने पीओकेमधील रावलकोटमध्ये सैन्याच्या हालचाली वाढवल्या आहेत. मोठ्या संख्येने सैन्य तैनात करण्यात आलं.