Priya Berde : अभिनेत्री प्रिया बेर्डे आता राष्ट्रवादीतून भाजपामध्ये

  • Written By: Published:
Untitled Design (26)

नाशिक : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्रिया बेर्डे ( Priya Berde )  यांनी आज भाजपमध्ये ( BJP )  प्रवेश केला आहे. सध्या नाशिक येथे भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू असून या बैठकीत बेर्डे यांनी हा प्रवेश केला आहे.  प्रिया बेर्डे गेल्या काही कालावधीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ( NCP )  कार्यरत होत्या.  पण त्यांनी आता राष्ट्रवादीला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

प्रिया बेर्डे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. बेर्डे यांनी 7  जुलै 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनोरंजन क्षेत्राशी निगडित समस्यांवर काम करत होत्या. भाजपामध्ये देखील त्यांच्याकडे मनोरंजन क्षेत्रासंबंधी एखादी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

 

प्रिया बेर्डे या दिग्गज दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी 80 व 90 च्या दशकामध्ये अनेक चित्रपटांमधून काम केले आहे. अशी ही बनवाबनवी,  झपाटलेला हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. तसेच त्यांनी मराठी व हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलेले आहे.

Tags

follow us