पंढरपूच्या वारीसाठी तुकाराम महाराजांच्या पालखीचे नियोजन, कार्यक्रम जाहीर

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 04 08 At 9.26.58 PM

Tukaram Maharaj’s Palakhi Announcement :महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांचा समावेश असतो.

यामधील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखीची घोषणा आज करण्यात आली. ही दरवर्षी 10 जूनला पंढरपूरकडे रवाना होत असते. ही पालखी साधारणतः 28 जूनला पंढरपूल दाखल होणार आहे. यंदा या पालखीचे 338 वे वर्ष आहे. पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आज पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले 

यंदा पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी 29 जूनला आहे. या वारीसाठी देहूच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 28 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. ही पालखी देहूवरुन 10 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube