Uttarkashi Tunnel : 17 दिवसांच्या हिंम्मत अन् आत्मविश्वासाची कहाणी

Uttarkashi Tunnel : वेळ आली होती पण काळ आला नव्हता. ही म्हण चपखल लागू पडलेली चित्त थरारक घटना म्हणजे तब्बल 17 दिवस उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेले मजुर. मात्र हे 17 दिवस म्हणजे मजूर आणि रेस्क्यू टीमच्या हिंम्मत अन् आत्मविश्वासाचे ठरले हे 17 दिवस कसे होते? दरम्यान काय-काय घडलं? मजुरांना कसं वाचवलं? त्यांना वाचवणारे ते देवदूत कोण होते ही सर्व कहाणी जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून…

उत्तरकाशी बोगदा हा चार धाम योजनेतील एक हिस्सा आहे. या योजने अंतर्गत हिमालयातील राज्यांमधील प्रमुख हिंदु धार्मिक स्थळं दोन लेनच्या पक्क्या रस्त्यांद्वारे जोडली जात आहेत. या बोगद्याची लांबी साडेचार किलोमीटर आहे. तर 12 नोव्हेंबरला याच सिल्क्यारा बोगद्याजवळ मजूर नेहमीप्रमाणे काम करत होते. त्यावेळी अचानक पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळण्यास सुरुवात झाली. अनेक कामगारांनी बाहेर पळण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी बोगद्याचा 60 मीटरचा भाग खचला आणि 41 कामगार बोगद्यात अडकून पडले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube