अहमदनगर : बळीराजासाठी अत्यंत महत्वाचा असलेला पोळा (Pola) हा सण अवघ्या एका दिवसावर आला आहे. हा सण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असल्यानं बाजारपेठा देखील लखलखीत सजल्या आहेत. मात्र यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच लम्पी रोगाच्या आजाराने थैमान घातल्याने बळीराजा चिंतेत आहे. एकंदरीतच यंदाच्या बैलपोळ्यावर दुष्काळाचे, महागाईचे व लम्पीचे (Lumpy) सावट असल्याचे […]
धनगर आरक्षण प्रश्नी सोलापुरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आल्यानंतर आता सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी तोडफोड करणाऱ्या धनगर आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. आठवलेंचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; पण खासदार, आमदार यांच्या आरक्षणाला विरोध राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असतानाच आता धनगर आरक्षणाचा […]
कोल्हापूरः कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. काही जण आमची बदनामी करत आहेत. परंतु उद्धव ठाकरे सरकार पडत होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) सगळ्या मंत्र्यांनी, आमदारांनी एक पत्र तयार केले होते. ते आमच्या नेत्यांना दिले होते. तेव्हा महायुतीत जायचे होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला […]
Cabinet Expansion : अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह राज्य सरकारमध्ये दाखल झाले. त्यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या आमदारांना वजनदार खातीही मिळाली. शिंदे गटातील आमदार मात्र कोरडेच राहिले. आता शिंदे-फडणवीस-पवार सराकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार […]
अहमदनगर : यंदा नगर जिल्ह्यासह राज्यात मान्सूनने पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले. अत्यल्प पावसामुळे अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. मात्र डोंगर माथ्यावर झालेल्या पावसामुळे नगर जिल्ह्यासाठी दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. नगर जिल्ह्यातील महत्वाचे मानले जाणारे भंडारदरा धरण (Bhandardara Dam)हे शंभर टक्के भरलं आहे. सलग चार वर्षे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे […]
अहमदनगर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशातच धनगर समाजही (Dhangar reservation) आरक्षणाची मागणी करू लागला. धनगर समाजाचे जामखेडमध्ये उपोषण सुरू झाले. धनगर समाजाला घटनेतील आरक्षण मिळावे, अशी धनगर समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी उपोषणकर्त्यांची भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी भेट घेतली. धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेच्या […]