अहमदनगर : गेल्या 7-8 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यानं मराठा समाज आणखीनच आक्रमक झाला असतांना आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही तापला. धनगर आरक्षणाच्या (Dhangar reservation) मागणीसाठी यशवंत सेनेने आजपासून (६ सप्टेंबर) चौंडी येथे बेमुदत उपोषण सुरू केलं. संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणासाठीचा वटहुकुम […]
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून सध्या राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. यातच पोलीस व उपोषणकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर वातावरण चिघळले. पोलिसांकडून उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. संतप्त जमावाने निषेध करत थेट बस पेटवल्या. दरम्यान खबरदारीची भूमिका म्हणून राज्यात अनेक ठिकाणी बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून याप्रश्नी आता आमदार […]
Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर त्यावरून आता सत्ताधारी व विरोधकांनी एकमेंकावर वार करण्यास सुरूवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आंदोलनस्थळाला भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत थेट गृहमंत्री […]
अहमदनगर : कबूतर चोरीचा कोणताही गुन्हा दाखल नसताना हरेगाव येथील चार जणांना मारहाण झाल्याची घटना जिल्ह्यात घडली. त्या तरुणांबाबत घडलेली घटना अत्यंत चुकीची असून या घटनेतील आरोपींविरोधात मोक्का (MCOCA) अथवा एमपीडीए अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी केली. (Ahmednagar News) श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील घटनेच्या […]
अहमदनगर : बारामतीला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चार मजुरांना बेदम मारहाण करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) शहरातील कायनेटिक चौकात अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा करून रिक्षाने पळून जाणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी पकडले आहे. स्वप्नील बाबुराव साळवे ( वय १९ […]
कोल्हापूर : कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने मंदिरे पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. पण साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचे दर्शन पितळी उबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र आता भाविकांना अंबाबाईचे (Ambabai) दर्शन गाभाऱ्यातून घेता येणार आहे. हा निर्णय उद्यापासून लागू […]