श्रेयवादाची लढाई ! काकडे यांच्या कामांचे आमदार राजळेंकडून श्रेय घेतले जात असल्याचा आरोप

  • Written By: Published:
श्रेयवादाची लढाई ! काकडे यांच्या कामांचे आमदार राजळेंकडून श्रेय घेतले जात असल्याचा आरोप

अहमदनगर: येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक (Assembly Election) असल्याने आता विकासकामांचे तसेच श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा व जिव्हाळ्याचा असलेल्या पाणी प्रश्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली. ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक एकबाबत शासनाने महत्वाचा आदेश काढला आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यातील वरुर आखेगावसह १३ गावाचा समावेश झाला आहे. याबाबत शासनाने आदेश देखील जारी केला आहे. शेवगाव तालुक्यातील काही दुष्काळग्रस्त गावांसाठी संजीवनी ठरणारी ताजनापूर टप्पा हा अत्यंत महत्वाचा आहे यासाठी जनशक्ती विकास आघाडीच्या हर्षदा काकडे (Harshada Kakade) यांनी शासन दरबारी मोठा पाठपुरावा केला मात्र याच कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न विद्यमान आमदार मोनिका राजळे (Monica Rajale) यांच्याकडून घेतला जात असल्याचा आरोप देखील केला जातो आहे.

‘ताजनापूर लिफ्ट जलसिंचन योजना’

1965साली जायकवाडी धरणाचे भूमिपूजन झाले. यावेळी कॉ.आबासाहेब काकडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी धरणाबाबत भूमिका मांडली. ‘अगोदर पुनर्वसन व नंतर धरण’ हा त्यांच्या मागणीचा प्रमुख होता. त्यांच्या या मागणीनुसार त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे महाराष्ट्र शासनाने जायकवाडी धरणामध्ये शेवगाव तालुक्याच्या नावाने ३.८ टी.एम.सी. पाणी राखून ठेवण्याचे मान्य केले. हेच पाणी शेवगाव तालुक्यातील जलाशयालगच्या गावांमधील शेतजमिनीला सिंचनासाठी देण्याची योजना म्हणजे ‘ताजनापूर लिफ्ट जलसिंचन योजना’ होय.

Video: टक्केवारी आमदार म्हणत मोनिका राजळेंना डिवचल; हर्षदा काकडेंनी विधानसभेचे रणशिंग फुंकलं

शेवगाव तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवा तसेच शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे व शिवाजीराव काकडे यांनी मोठे जनआंदोलन उभारले होते. वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा देखील केला. यातच तालुक्यातील 13 गावांसाठी लाभदायक असलेली ताजनापूर लिफ्ट जलसिंचन योजनेबाबत देखील वारंवार आंदोलने केली. अखेर या लढल्याला यश आले आहे. ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक एकमध्ये वरुर आखेगावसह 13 गावांचा समावेश करण्याबाबतचा आदेश शासन स्तरावरून जारी करण्यात आला आहे. मात्र काकडे यांच्या या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्णत्वास झाले. मात्र याच कामाचे श्रेय विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्याकडून घेतला जात असल्याचा आरोप आता केला जातो आहे.

काकडेंचा पाठपुरावा व फडणवीसांचे आश्वासन

ताजनापूर योजनेत तालुक्यातील काही गावांचा समावेश करून त्यासाठी निधी देण्याची मागणी अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांच्यासह शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जानेवारी महिन्यात समक्ष भेटून केली. जायकवाडी जलाशयाच्या पाण्यासाठी जनशक्ती मंचचे अध्यक्ष अ‍ॅड काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्यासह शेतकरी शिष्टमंडळाने मुंबई येथे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताजनापूर योजना संदर्भात भेट घेतली. या भेटीत ताजनापूर टप्पा 1 ला मंजुरी देऊन त्यामध्ये 9 गावांचा समावेश करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. हा प्रकल्प समजून घेत प्रकल्पास मंजुरी देऊन तो पूर्ण करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube