‘त्या’ गोष्टी फक्त निवडणूक काळापुरतीच होत्या का? ; वळसे पाटलांकडून कोल्हेंचा खरपूस समाचार

  • Written By: Published:
‘त्या’ गोष्टी फक्त निवडणूक काळापुरतीच होत्या का? ; वळसे पाटलांकडून कोल्हेंचा खरपूस समाचार

पिंपळगाव खडकी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडून गेल्यानंतर इंद्रायणी मेडिसिटीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले. पुणे-नाशिक रेल्वेचा तपास नाही. या गोष्टी फक्त निवडणुकीसाठीच होत्या, अशी टीका उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी केली. पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे कोपरा सभेत मतदारांशी संवाद साधना दिलीप वळसे पाटील बोलत होते.

माझ्या पराभवाचा वचपा यावेळी काढा; आढळरावांनी शेवटच्या क्षणी वळसे पाटलांसाठी डाव टाकला…

पाण्यासाठीच मी सत्तेत सहभागी

कोपरासभेत बोलतना वळसे पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा सामुहिक निर्णय घेण्यात आला. एकूण ४२ आमदार सतेत सहभागी झाले. माझा हा वैयक्तिक निर्णय नव्हता. माझ्यासमोर हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाचे पाणी, बोगद्याचा विषय जिव्हाळ्याचा आहे. त्यासाठीच मी सत्तेत सहभागी झाल्याचे वळसे पाटलांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

विजय तर वळसे पाटलांचाच; भेटीदरम्यान आढळरावांनी जयंत पाटलांना सांगून टाकलं

ते म्हणाले की, २०१९ ला निवडून गेल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले; परंतु अनेक आमदारांना विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता विकास कामे होत नव्हती अशा तक्रारी घेऊन आमदार येत होते. त्यानंतर राज्यातील भाजपा महायुतीच्या सरकारमध्ये जाण्याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी सामुहिकरित्या घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले.

विकासकामे करण्याची धमक वळसे पाटलांमध्येच; चाकणकरांनी द्विगुणीत केला विजयाचा विश्वास

‘त्या’ गोष्टी निवडणुकीसाठीच होत्या

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडून गेल्यानंतर इंद्रायणी मेडिसिटीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले. पुणे-नाशिक रेल्वेचा तपास नाही. या गोष्टी फक्त निवडणुकीसाठीच होत्या, अशी टीका उमेदवार वळसे पाटील यांनी केली. यावेळी माजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील मथाजी पोखरकर, सचिन बांगर, धोंडीभाऊ बांगर, अरुण बांगर, संदीप बांगर, अनसु पोखरकर, सचिन बांगर, ज्ञानेश्वर पोखरकर, अरुण पोखरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube