फक्त फोन उचलून विकास होत नाही तर..,; तानाजी सावंतांचा ओमराजेंवर निशाणा
Tanaji Sawant News : फक्त फोन उचलून विकास होत नाही तर 2 हजार कोटींचा निधी आणण्यासाठी मनगटात बळ लागतं, या शब्दांत महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर साधलायं. यावेळील बोलताना तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच नाव न घेता निशाणा साधलायं. महायुतीकडून तानाजी सावंत भूम परांडा मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर तानाजी सावंत यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे. मतदारसंघात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा, सुजात आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन
तानाजी सावंत म्हणाले, कारखाना बापाने काढला तो पोराने चावलवायचा प्रयत्न केला पण तो बंद पडला. त्याने पिंडिला पाय लावला आणि तिकडं झक मारली. पदे ही सर्वसामान्य जनतेला सुखाचे दिवस आणण्यासाठी वापरायचे असतात. तुम्ही विकासाची भाषा करता, आज आपल्या जिल्ह्यात 4 कारखाने चालू आहेत. एकाचं काम सुरु आहे, महिलांना बचत गटातून मदत झालीयं, रोजगार देण्याचं काम सुरु आहे, फक्त फोन उचलून विकास होत नाही तर 2 हजार कोटींचा निधी आणण्यासाठी मनगटात बळ लागतं, असं तानाजी सावंत म्हणाले आहे.
‘संभाजी झेंडेंना उमेदवारी देणं ही वैचारिक दिवाळखोरी, स्वाभिमान कुठं…’; अजितदादांवर शिवतारे संतापले
तसेच 288 आमदारांमध्ये 288 आमदारांमध्ये आवाज उठवता आला पाहिजे, कोणाची नजरवर झाली नाही पाहिजे असा मी तानाजी सावंत आहे. पेरणेचं भंगार कोणी चोरुन विकलं. 36 हजार सभासद असलेला कारखाना आज देशोधडीला लागला. 2019 ते 2024 ला तू ठरवलेल्या बापाने तुला निवडून आणलं आहे. याचे पैसे बुडवले त्याचे बुडवले, अशी टीकाही तानाजी सावंत यांनी केलीयं.
मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालावली; छातीत दुखत असल्यामुळे रूग्णालयात दाखल
परंडा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदार संघातून तानाजी सावंत हे निवडून आलेले आहेत. परंतु शिवसेना फुटल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले आहेत. ते सध्या आरोग्यमंत्री आहेत. तानाजी सावंत यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून माजी आमदार तथा शिवसेना नेते दिवंगत ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय.