- Letsupp »
- Author
- Abhishek Gawande
Abhishek Gawande
-
मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंची वाईल्ड कार्ड एन्ट्री अन् कोकाटेंच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट, वाचा नेमकं काय घडलं?
Manikrao Kokate and Dhananjay Munde: राज्याच्या मंत्रीमंडळात फेरबदलाचे वारे वाहायला सुरूवात झाली. शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंनाही नारळ मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे, मात्र यात लक्ष वेधलं ते एका बातमीनं ते म्हणजे धनंजय मुंडे यांना मिळालेली क्लीन चीट. मुंबई उच्च न्यायालयाने कृषी साहित्य खरेदी व वितरण निर्णय वैध ठरवत मुंडेंवरील 245 कोटींच्या भ्रष्टाचाराचे […]
-
मुल होत नाही, दारू सुटत नाही म्हणून करायचा अघोरी उपचार; लघुशंका पाजणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या शिऊर गावातून अंगावर शहारे आणणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. श्रद्धेच्या नावाखाली समाजातील साध्या- भाबड्या लोकांना गंडवणारा एक बाबा… गेल्या कित्येक महिन्यांपासून तो अघोरी पद्धतीनं उपचारांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता. शिऊर गावचा रहिवासी असलेला संजय पगार, वय ५० वर्षे असं आरोपीचं नाव आहे. या आधी तो लग्नासाठी घोडे […]
-
सावधान: बुधवार पेठ ते घर… आयटी अभियंत्याचा पाठलाग करत बनवला व्हिडिओ
Budhawar Peth Blackmail: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात एक नवा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आला आहे. शहरात फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या घटना वाढत असल्याचं या घटनेनं समोर आलं आहे. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका अभियंत्याचा पाठलाग करून त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. संपूर्ण […]
-
अजितदादांची माफी मागणारा, आव्हाडांसाठी पडळकरांना भिडणारा… नितीन देशमुख कोण आहे?
Jitendra Awhad And Nitin Deshmukh : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी सायंकाळी विधानभवन परिसरात एक लज्जास्पद घटना घडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. हा प्रकार विधानभवनाच्या लॉबीतच घडला. झालं असं की, जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. […]
-
काशीत मोरारी बापूंना विरोध; धर्माला धंदा बनवू नका, ‘या’ काळात रामकथा योग्य नाही– संतांचा आक्षेप
Morari Bapu Controversy: सध्या देशभरात चर्चेत असलेला एका धार्मिक वाद – कथावाचक आणि आपल्या शांतीप्रिय स्वभावामुळे वेगळेपण जपणारे मोरारी बापू यांच्या काशीमध्ये सुरू झालेल्या रामकथेचा, आणि त्या अनुषंगाने उठलेला ‘सूतक’ वाद. प्रकरण काय आहे ते आपण समजावून घेणार आहोत, कोण काय म्हणालं? नेमकं वादाचं कारण काय? ते जाणून घेऊया. प्रसंग आहे उत्तर प्रदेशातील वाराणसीचा. १३ […]
-
पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग: प्रवास फक्त ३ तासांत, २८,४२९ कोटींचा ऐतिहासिक प्रकल्प
Pune-Nashik travel in just 3 hours: पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो पुणे, अहमदनगर (आता अहिल्यानगर) आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 133 किलोमीटर आहे आणि तो पूर्णपणे नवीन मार्गावर (ग्रीनफिल्ड) बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी १५४५ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार असून, मार्गावर १२ मोठे […]
-
चीननंतर तुर्कीशी बांगलादेशची मैत्री; संरक्षण करार भारतासाठी डोकेदुखी!
Bangladesh’s friendship with Turkey is a headache for India: सध्या बांगलादेश आणि तुर्कीमधील संबंध झपाट्याने दृढ होत आहेत. याआधी बांगलादेशने संरक्षण क्षेत्रात प्रामुख्याने चीनवर अवलंबून राहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र, तंत्रज्ञान आणि उपकरणे खरेदी केली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत तुर्कीने बांगलादेशमध्ये संरक्षण क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवण्यास सुरुवात केली आहे. तुर्कीचे संरक्षण उद्योग सचिव हलुक गोरगुन […]
-
आमदार साहेब असं वागणं बरं नव्हे! संजय गायकवाड: शिवीगाळ, मारहाण, महापुरुषांचा अपमान आणि बरंच काही…
Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Thrashes Canteen Worker: बुलढाण्यापासून थेट मुंबईपर्यंत, जिथे जिथे संजय गायकवाड तिथे तिथे नवा वाद, असं काहीसं समीकरण गेल्या काही वर्षांपासून तयार झालंय. एक आमदार म्हणून ते कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात, पण त्या प्रसिद्धीमागे असते ते त्यांचं वादग्रस्त वक्तव्यं, आक्रमक भूमिका आणि कधी कधी तर थेट मारहाण. सध्या सर्वात जास्त चर्चेत […]
-
मुंबईत ३२ वर्षांच्या CA ची समलैंगिक संबंधांतून आत्महत्या: नेमकं प्रकरण काय?
CA Suicide Over Private Video Blackmail: व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असलेला राज मोरे. वय ३२ वर्षे, मुंबईसारख्या महानगरात स्वतःचं स्थान निर्माण केलेला, कष्टाळू आणि यशस्वी तरुण. घरात थकलेली आई आणि बहीण, सगळं नीट सुरू होतं. आता कुठे आयुष्य स्थिर झालं, सगळं सुरळीत पार पडतंय, असं वाटायला लागलं. पण, अचानक एक असं वादळ आलं की सगळंच पार […]
-
केरळची नर्स निमिषा प्रियाला येमेनमध्ये फाशी…ब्लड मनी म्हणजे काय?
Nimisha Priya Indian Nurse Sentenced To Death In Yemen: निमिषा प्रिया प्रकरण सध्या चर्चेत आहे. एक भारतीय नर्स, जीला येमेनमध्ये फाशीच्या शिक्षा सुनावण्यात आली आहे. निमिषा प्रिया नेमक्या कोण आहेत, काय आहे हे नेंमकं प्रकरण, येमेनमध्ये फाशीची शिक्षा टाळायची असेल तर नेमकं काय प्रावधान आहे? ही कहाणी सुरू होते केरळच्या पलक्कड जिल्ह्यातून. निमिषा प्रिया, एक […]










