Maratha Reservaition : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके(Prakash Solanke) यांचं निवासस्थान पेटवल्यानंतर आता बंधू धैर्यशील सोळंकेंच्या बंगल्यातून आगीचे लोळ पाहायला मिळाले आहेत. धैर्यशील सोळंके यांच्या बंगल्याच्या परिसरात मराठा आंदोलकांना गाड्या जाळून टाकल्या आहेत. एवढचं नाहीतर सोळंके यांच्या घरातील साहित्य रस्त्यावर आणून जाळले आहेत. […]
World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करणाऱ्या अफगाणिस्तानने पुन्हा एकदा मोठा उलटफेर केला आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी आज 30 वा सामना अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंकेत सामना रंगला. या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करीत 241 धावांचा पल्ला गाठला होता. अफगाणिस्तानने 45.2 षटकांत 242 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानने नाणेफेक […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत असल्याचं पाहायला मिळतं आहे. राज्यातील विविध ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा तरुण जीवन संपवत आहेत. अशातच आता अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातही मराठा तरुणाने जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. खरवंडी गावातील दत्तात्रय अभिमन्यू भोगे या तरुणाने साठवण बंधाऱ्यात उडी घेत जीवन संपवलं आहे. Maratha Reservation : बीडमध्ये आमदारांचं निवासस्थान पेटवलं; […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन चांगलच वादंग पेटलं आहे. मराठवाड्यातील संतप्त मराठा आंदोलकांनी आमदारांच्या निवास्थानांवर हल्लाबोल करीत जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. एवढचं नाहीतर माजलगाव नगरपरिषद कार्यालयालाही आग लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरासह 5 किलोमीटर अंतरापर्यंत तर प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर संचारबंदीचे आदेश […]
राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पद्मश्री पोपटराव पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादंग पेटलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरु आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. या परिस्थितीवर भाष्य करणारं पत्र पद्मश्री पोपटराव पवार यांनी फडणवीसांना पाठवलं आहे. Vikramaditya […]
World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघ म्हणावं तशी कामगिरी करु शकला नाही. पाकिस्तान संघ उपांत्य फेरी गाठण्याचीही शक्यता आता राहिलेली नाही. अशातच आता पाकिस्तान संघात मोठा वाद सुरु असल्याचं समोर आलं आहे. खराब कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट संघाकडून वादग्रस्त विधाने केली जात आहेत. तर कर्णधार बाबर आझमची खाजगी चॅट व्हायरल झाली आहे. तसेच […]
Maratha Reservation : मला जाळपोळीच्या घटनांची किंवा हिंसेची माहिती मिळाली तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांचा आजचा सहावा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्यावरुन जरांगे पाटलांनी हे विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; […]
Ashok Chavan Speak on Maratha Reservation : मागील चाळीस दिवस सरकारने काय केलं? असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. राज्यात सध्या पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगेंनी(Manoj Jarange) पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसल्याने सरकारकडून जरांगेंना आणखी वेळ मागण्यात येत आहे. त्यावरुन आता अशोक चव्हाणांनी सरकारलाच […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वादंगच पेटल्याचं दिसून येत आहे. सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून राज्यभरातील अनेक गावांत राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याचदरम्यान खासदार आमदारांच्या राजीनाम्याचं सत्रही सुरु झाल्याचं पाहायला […]
Cm Eknath Shinde : सरकारी काम सहा महिने थांब आम्ही मागे सारलं असल्याची जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. यवतमाळमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ‘कधी ग्रामपंचायत लढवली नाही अन् आता..,’; प्रकाश सोळंके ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटले? मुख्यमंत्री […]