अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
पुणे : माझ्यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त आहे, माझ्या पाठीवर चाळीस वार करण्यापेक्षा समोरुन एक वार करुन पाहाच, अशी डरकाळी शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी फोडलीय. प्रचारसभेत बोलत असताना ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांना थेट ललकारल्याचं दिसून आलं आहे. पुण्यातील विधानसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास […]
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टाकलेली नवी गुगली नो बॉल असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. दरम्यान, पहाटेच्या शपथविधीवरुन राज्यात राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी सुरु असल्याची परिस्थिती आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. आता त्यावरुन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी फडणीसांवर टीकास्त्र सोडले आहे. तपासे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी गुगली देवेंद्र फडणीसांनी […]
मुंबई : अजित पवार यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्यावेळी घेतलेल्या शपथविधीवरुन आजही वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यावरुन अजित पवार यांना लक्ष्यही केले जाते. त्यात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच पहाटेचा शपथविधी झाल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात राष्ट्रवादीसोबत […]
पुणे : राज्याचे गृहमंत्रीच आक्रमक व्हायला लागले, तर मायबाप सरकार कसं असेल, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. सुळे एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, मी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खूप हुशार समजत होते, मात्र राज्याचे गृहमंत्रीच आक्रमक होत असतील तर मायबाप सरकार […]
पाकिस्तानात मागील दहा दिवसांपासून सुरु असलेली आएमएफची बैठक निष्फळ ठरली आहे. कारण पाकिस्तानला मोठी आशा असलेल्या बैठकीनंतर आएमएफची टीम पाकिस्तानला कर्ज न देताच माघारी परतली आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर मोठं आर्थिक आव्हानच उभं राहिल आहे. एसबीआय पाकिस्तानच्या तिजोरीतील 3 फेब्रुवारीपर्यंतचा परकीय चलनाचा साठा 2.91 अब्ज डॉलवर आला आहे. त्यामुळे आता आएमएफकडूनही कर्ज मिळण्याची आशाही मावळली आहे. […]
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अद्याप राज्यसेवा परिक्षेच्या निर्णयाबाबत स्पष्टपणे जाहीर करण्यात आले नसून कृषी, वन, अभियांत्रिकीच्या परिक्षा वर्णनात्मक पध्दतीने २०२३ होणार असल्याचं जाहीर केलंय, त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. आयोगाने तत्काळ प्रसिध्दीपत्रक काढून संभ्रम दूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलीय. याबाबत पत्र […]
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून अमृत काळ म्हटलं जातंय, पण शैक्षणिक, आरोग्य, आणि कृषीचा पैसा कुठं जातो? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर शेलक्या शब्दांत हल्लाबोल चढविला असून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरही टीकास्त्र सोडले आहे. सुळे यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारला चांगलचं धारेवर धरल्याचं दिसून आलंय. […]
सोलापूर : कोण रोहित पवार? काही लोकांमध्ये पोरकटपणा असतो, आमदार म्हणून त्यांची पहिलीच टर्म आहे. त्यांना थोडे दिवस दिले की, मॅच्युरिटी येईल, या शब्दांत काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना सुनावले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ‘सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा’ अशी मागणी सोलापूर […]
रत्नागिरी : मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही शरद पवारांकडे शिवसेना गहाण ठेवल्याचा घणाघात शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केलं आहे. कदम रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. कदम म्हणाले, ज्या दिवशी आम्हांला काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, तेव्हा आम्ही शिवसेना नावाचं दुकान बंद करू, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र, तुम्ही सेना-भाजपमधून निवडून आले […]
अहमदनगर : शंभर कोटींच्या बदल्यात मंत्रिपद मिळत असेल आणि असं झालंच तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म गाव असलेल्या चौंडीपासून अहमदनगरचे अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर करण्यासाठी काढण्यात आलेल्या रथयात्रेला आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली यावेळी ते बोलत होते. Cow Hug […]