अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
भारताने न्यूझीलंडसमोर 235 धावांचं आव्हान ठेवलं असून या निर्णायक सामन्यात भारताचा फलंदाज शुभमन गिलने शानदार शतक ठोकलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडियमवर भारत-न्यूझीलंडमध्ये तिसरा टी20 सामना रंगला आहे. या सामन्यादरम्यान, युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने अवघ्या काही चेंडूतच शानदार शतक केल्याचं पाहायला मिळालंय. विशेष म्हणजे गिलने न्यूझीलंडविरुध्दच्या तीन एकदिवसीय सामन्यात एक शतक त्यानंतर द्विशतक आता टी20 […]
ठाणे : माझ्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही, तरीही माझ्या अटकेचं षड्यंत्र सुरु असून ठाणे महानगरपालिका निवडणुक काळात मला जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यापूर्वी यांनी मला अटक होऊ शकते, असा […]
मुंबई : हा तर चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Shinde) यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला असून अर्थसंकल्पावर अजित पवारांनी (Ajit Pawar) टीकास्त्र सोडले आहे. अजित पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून […]
मुंबई : आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलीकडं अर्थसंकल्पात काहीही ठोस नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. आज अर्थसंकल्पीय अधिवेशात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर केलंय. पटोले म्हणाले, अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प […]
नवी दिल्ली : अमृत काळातला भारताचा हा पहिला बजेट विक्षित भारताच्या विराट संकल्पाला पूर्ण करण्यासाठी मदत करणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. तसेच जनतेनं नव्या संकल्पना घेऊन पुढे चालून समृध्द आणि संपन्न बनवूया असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलंय. पंतप्रधान मोदी म्हणाले, हे बजेट देशातील वंचित समाज, गरीब, शेतकरी, […]
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी बजेट सादर करताना ‘ओल्ड पॉल्युटेड व्हेहिकल’ ऐवजी ‘ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल’ असा उल्लेख केल्याने सभागृहातील नेत्यांच्या तोंडावर एकच हशा पिकल्याचं दिसून आलं. आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सितारामण यांना देखील हसू आवरलं नसल्याचं यावेळी दिसून आलंय. दरम्यान, देशाचं बजेट सादर करताना अर्थमंत्री चुकल्या आहेत. अर्थमंत्री चूकल्यानंतर […]
अहमदनगर : अहमदनगरमधील राळेगण म्हसोबा गावात एक अजब घटना घडलीय. एका शेतकऱ्याच्या शेतात नवीन बोअरवेलचं काम सुरु असताना अचानक जुन्या बोअरवेलमधून मोटार आणि पाईप बाहेर निघाल्याची आश्चर्यकारक घटना घडली. नेमकं काय घडलं? नगर तालुक्यातील अनिल कोतकर नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात नवीन बोअरवेल घेण्याचं काम सुरु होतं. या शेतकऱ्याच्या शेतात याआधीह एक बोअरवेल होता. जुना बोअरवेल त्यांनी […]
निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या मराठी चित्रपटानं #SCOFilmFestival मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. याआधीही अनेक पुरस्कारांनी गोदावरी चित्रपटाचा गौरव करण्यात आला आहे. ‘गोदावरी’ चित्रपटात निशिकांतची कथा दाखवण्यात आली आहे, जो आपल्या परिवारापासून काही कारणास्तव दूर झाला आहे. मुळात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध घेण्याकरता व कधीही न तुटलेली नाती सुधारण्यासाठी पुन्हा घराची वाट पकडत असतो. […]
मुंबई : महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांच्या माझ्या वक्तव्याला विचित्र स्वरुप दिलं जात असून मी केलेल्या वक्तव्याबद्दल हात जोडून जाहीरपणे माफी मागत असल्याचं बागेश्वर धामचे बागेश्वर बाबांनी(Bageshwar baba) स्पष्ट केलंय. काही दिवसांपूर्वी बागेश्वर महाराजांनी जळगावात संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. बागेश्वर महाराज म्हणाले, संत तुकाराम महाराजांबद्दल मी केलेल्या वक्तव्याचं विचित्रीकरण सुरु असून संत तुकाराम […]
मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तूनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय लोकसेवा […]