Nitin Gadkari Threat : जयेश पुजारीवर एनआयएकडून गुन्हा दाखल…

Nitin Gadkari Threat : जयेश पुजारीवर एनआयएकडून गुन्हा दाखल…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारी आणि त्याच्या साथीदाराविरोधात राष्ट्रीय तपास पथकाकडून (NIA) स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री नितीन गडकरी यांना जयेश पुजारी(Jayesh Pujari) याने 100 कोटी रुपयांची खंडणी मागून बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यावर बंगळूरुमध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल झाल्याने आता जयेशला पुढील दोन दिवसांत राष्ट्रीय तपास पथक ताब्यात घेणार असल्याची माहिती समोर आलीय.

Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची तीनदा धमकी देण्यात आली होती. गडकरींच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती.

जयेश पुजारी उर्फ जयेश कांथाच्या नावाने दोनदा धमकीचे कॉल आले होते. जयेश पुजारी बेळगावच्या जेलमध्येच होता. त्यानंतर पुन्हा जयेश पुजारीच्या नावाने दुसऱ्यांदा धमकीचा फोन आला. त्याला बेळगावमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

प्रचार संपल्यानंतरही काँग्रेसचे टेन्शन कायम; बजरंग दलाने केली ‘ही’ मोठी घोषणा

जयेश पुजारी ऊर्फ सलीम शाहीर हा बेळगाव कारागृहात बंदिस्त असताना दाऊद टोळीच्या दोन सदस्यांच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने दाऊद गँग, अल-कायदा, पीएफआय आणि लष्कर- ए- तोएबा यांच्याकडून आसाममध्ये शस्त्र आणि बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. या सर्व कृत्यामुळे जयेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, नागपूर पोलिसांनी जयेशला ताब्यात घेण्यासंदर्भात ‘एनआयए’ कार्यालयाला पत्र लिहिले होते. त्यामुळे मुंबई ‘एनआयए’च्या पथकाने जयेश पुजारीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचे दस्तावेज ताब्यात घेतले असून आता कारागृहातून जयेशला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झालीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube