वज्रमुठीचा अवतार आता संपुष्टात, विखेंनी कोणालाही सोडलं नाही…
वज्रमुठीचा अवतार आता संपुष्टात आला असल्याचा घणाघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. राधाकृष्ण विखे यांनी आज शिर्डीतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत होते. विखे यांनी आज बोलताना या वक्तव्यातून महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांवर टीका केलीय.
40 टक्क्यांवरुन शरद पवारांनी हाणला डाव, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अखेर बोललेच
विखे म्हणाले, सध्या राज्यात आपण जे वास्त पाहतोय, त्यातून तडे गेल्याचं दिसून येतंय. त्यामुळे वज्रमूठ एकमेकांवर उखडल्याशिवाय राहणार नसून पुढील काळात वज्रमूठीचा अवतार आता संपुष्टात आला असल्याचं राधाकृष्ण विखे म्हणाले आहेत.
IPL 2023: प्लेऑफची लढत मनोरंजक, सर्व संघ शर्यतीत, जाणून घ्या समीकरण
तसेच तिसरी आघाडी किंवा दुसरी आघाडी उभे करणे हे सर्व प्रकार याआधीही झालेले आहेत. नेत्यांची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरु असून कुणी कितीही आघाड्या बांधल्या तरी त्याचा काय परिणाम होणार नसल्याचं विखे म्हणाले आहेत.
सध्या महाराष्ट्रात वज्रमूठची काय अवस्था आहे हे आपल्याला सर्वांना माहित आहे, इथल्या नेत्यांना राज्याची वज्रमूठ बांधता आलेली नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान, सहकार क्षेत्र कोणी संपवलं, खाजगीकरण कोणी केलं? याबाबत सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे लोकांचा भाजपवर विश्वास असल्याचं विखे यांनी सांगितलंय.