अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
मुंबई : राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या लढ्यापुढं अखेर सरकार झुकलं असून एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णयाचं स्वागत करत असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हटंलय. तसेच भाजपच्या नेत्यांनी यांच फुकटचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अनेक दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला अखेर यश मिळालं असून काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या […]
मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे आरोप म्हाडाने खोटे ठरवले असून कार्यालय माझं नसल्याचं लेखी उत्तर म्हाडाने दिल्याची माहिती माजी मंत्री अनिल परब (Anil Parb) यांनी दिलीय. मुंबईतील बांद्रा येथील म्हाडा वसाहतीमध्यील शिवसेना आमदार अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. अनिल परब म्हणाले, म्हाडाच्या कार्यालायाकडून मला पाठवण्यात आलेली नोटीस कुठलीही […]
मुंबई : आमदार अनिल परबांचं अर्ध रिसॉर्ट तोडलं, बाकी ईडीने ताब्यात घेतलं, आता कार्यालयही गेल्याने त्यांच्याविषयी मला वाईच वाटत असल्याचं खोचक विधान भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलंय. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, अनिल परब (Anil Parab) यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आलं आहे. परबांचं कार्यालय तोडल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हाडाच्या कार्यालयात गोंधळ घातला आहे. […]
पुणे : दिल्लीतील नेत्यांकडून ग्रीन मिळाला की, दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी लगावला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार अद्याप बाकी आहे. पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला असून आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिंदे-फडणवीस(Shinde-Fadnvis) सरकारमधील आमदारांचं लक्ष लागून राहिलंय. अशातच अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर […]
पुणे : बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) कोण हे मला माहित नाही, पण बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळीरांविरोधात कायदा केला पाहिजे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी केलीय. तसेच काही लोकांकडून महागाई, बेरोजगारी या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशी वक्तव्ये केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. पवार म्हणाले, राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांवर अवमाजनक […]
पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आमच्याकडे 7 ते 8 जणांनी उमेदवारी मागितल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलंय. आज अजित पवार यांच्या उपस्थितीत अभिनेते प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, पोटनिवडणुकीसाठी प्रत्येकाला आपापली तयारी करण्याचा अधिकार असून कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील […]
अहमदनगर : विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 147 मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 79 हजार 923 पुरुष तर 35 हजार 715 महिला असे एकूण 1 लक्ष 15 हजार 638 मतदार होते. त्यापैकी […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी एकूण 49.28 टक्के मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी दिलीय. नाशिक पदवीधर निवडणूकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यामुळे ही निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज […]
जळगाव : बागेश्वर बाबानंतर आता योगगुरु बाबा रामदेव(Baba Ramdev) यांनी देखील वादग्रस्त विधान केलंय. आम्ही जर हत्यारं उचलली असती, तर आज इथे एक सुद्धा मुस्लिम आणि ख्रिश्चन राहिला नसता, असं वादग्रस्त विधान योगगुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे. जळगावमधील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे हिंदू गोर बंजारा –लबाना -नायकडा समाज कुंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]
पुणे : बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली. रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुळे यांनी ही मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बारामती परिसरात उद्योग व्यवसाय शिक्षणाच्या निमित्ताने दररोज […]