अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
मुंबई : सर्वोच्च न्यायालय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करणार नसल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली. ही सुनावणी आता 14 फेब्रुवारीला होणार असल्याचा निर्णय न्यायालयाकडून घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निकम म्हणाले, नव्या सात सदस्यीय घटनापीठासाठी ठाकरे गटाकडून आज याचिका दाखल करण्यात […]
मुंबई : शिवसेना वकीलांमार्फत बाजू मांडत आहे, निर्णय काय येणार? हा न्यायालयाचा अधिकार असून मी यावर भाष्य करणार नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली पाहिजे, तसेच भविष्यामध्ये राजकीय […]
अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या सरपंच आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शशिकला पवार अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित त्यांनी भाजपात प्रवेश केला. शशिकला पवार म्हणाल्या, “मी ग्रामपंचायत […]
नाशिक : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 21 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरु असणार आहे. तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च यादरम्यान होणार आहे. नाशिक विभागात दहावीच्या परीक्षेसाठी दोन लाखांपेक्षा अधिक तर बारावीच्या परीक्षेसाठी […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून आमदार डॉ. सुधीर तांबे निवडणूक लढविणार हे स्पष्ट आहे. मात्र भाजपकडून उमेदवार निश्चित झालेला नाही. भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे यांनी सूचक विधान केले आहे. राम शिंदे म्हणाले, नाशिक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करत असताना त्याच्यावर विचार विनिमय […]
पुणे : जी -20 परिषदेचे आयोजकपद भारताकडे आले आहे. पुणे शहरात जानेवारी, जून आणि सप्टेंबर अशी तीन वेळा बैठक पार पडणार आहे. 16 आणि 17 जानेवारी रोजी या परिषदेसाठी जगातील 37 देशातील 120 प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, […]
मुंबई : अंधेरीच्या कामगार हॉस्पिटलची पाच हजार कोटी रुपये किमतीची जवळपास १२ एकर जमीन अदानी या उद्योगपतीच्या घशात घालण्याचे षडयंत्र असल्यानेच हे हॉस्पिटल सुरु केले जात नाही, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केला आहे. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, अंधेरीमध्ये १९७७ साली या कामगार […]
मुंबई : 26/11 च्या हल्ल्यातील अतिरेक्यांनी केलेला गोळीबार मी डोळ्यांनी पाहिला असल्याचं उद्योजक गौतम अदानी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. यावेळी त्यांच्यावर कोणता प्रसंग आला होता त्याचं वर्णनही त्यांनी यावेळी केलं आहे. 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईतील ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला. हा हल्ला आत्तापर्यंतचा अतिरेक्यांचा सर्वात मोठा हल्ला मानला जातो. या हल्ल्यात जवळपास 166 […]
पुणे : आता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांना मिळणार दुप्पट अनुदान मिळणार असल्याची माहिती वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, चित्रपटांच्या अनुदान नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अ, ब, क, ड अशी वर्गवारी करण्यात आली. यापुढे थीम आधारित चित्रपटांना अनुदान देण्याचा आपण निर्णय करत आहोत. […]
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अमृत सागर दूध संघाची निवडणूक आज झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला धूळ चारत माजी आमदार वैभव पिचड यांच्या पॅनलने विजय मिळविला. त्यांच्या पॅनलने 15 पैकी 13 जागांवर विजय मिळविला. मागील वर्षी अगस्ती सहकारी साखर कारखाना व राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना चाळीस वर्षांची सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे अमृत सागर […]