अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असा नंगा नाच चालू देणार नसल्याचं भाजप महिला मोर्चाच्या चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलंय. त्या मुंबईतून पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दरम्यान, काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाकयुध्द आता चांगलंच पेटलं आहे. चित्रा यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन उर्फीविरोधातली त्यांची कारवाई शेवटपर्यंत सुरुच राहणार […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी जोर धरत आहे. अशा स्थितीत अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नामांतरा आधी जिल्हा विभाजन करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे नामांतरा बरोबरच जिल्हा विभाजनाच्या प्रश्नानेही डोके वर काढले आहे. आमदार संग्राम जगताप म्हणाले, नामांतराला आमचा कुणाचाही विरोध नसणार आहे. आमची मागणी आहे की या नामांतरा आधी जिल्हा विभाजन […]
पुणे : राज्यातील क्रीडा क्षेत्राला काही कमी पडू देणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलंय. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये राज्य ऑलम्पिक स्पर्धेच उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते हा उद्धाटन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले, कार्यक्रमाचा […]
मुंबई : महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य असून मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ […]
नवी दिल्ली : झारखंडमधील पारसनाथ येथे असलेल्या जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र राहणार असून तीर्थक्षेत्र परिसरात बांधकाम, हॉटेल, ट्रेकिंग आणि मांसाहारावर बंदी घालण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, हे पवित्र स्थळ यापुढे पर्यटन क्षेत्र राहणार नाही. सर्व पर्यटन आणि इको-टूरिझम उपक्रमांवर बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. […]
मुंबई : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली असून यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षेनेते अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमधील काही आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, अजित पवार यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. अजित पवारांच्या नावाने घोषणा देण्यात आल्याने ही […]
पुणे : कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यक्रमाला दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. कार्यक्रमाला संग्राम थोपटे गैरहजर राहिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. बारामतीमध्ये ज्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत, त्याच कार्यक्रमाला दांडी मारुन थोपटे संग्राम थोपटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात […]
नाशिक : चंद्रशेखर बावकुळेंना दुसऱ्याच्या डोळ्यातली कुसळ दिसते, पण स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नसल्याचा खोचक टोला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला अवमान बावनकुळेंना दिसत नसल्याने ते कुसळ शोधण्यात व्यस्त आहेत. आता […]
मुंबई : प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याशी युती करत आहेत, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी दिलीय. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शिवसेनेचे उध्दव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीसंदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाल्याचं दिसून येत आहे. अद्याप […]
पुणे : महाराष्ट्रातला माणूस भीक मागत नाहीतर मोठ्या हिमतीने, कष्टाने संकटांवर मात करत असल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते बुधवारी झाला. त्यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसापुढे महागाईचे […]