अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
मुंबई : पोलीस दलाच्या इतिहासात मोठी घटना आज राज्यात घडली आहे. अती प्रतिष्ठित अशा मुंबई पोलीस आयुक्त या पदाच्या समकक्ष असलेल्या “विशेष पोलिस आयुक्त” हे पद निर्माण करण्यात आलं आहे. पोलीस सह आयुक्त पदाच्या अधिकाऱ्यावर अधिक चांगलं नियंत्रण ठेवता, यावे यासाठी हे पद निर्माण केल्याचं शासनाने म्हटलं आहे, तर पोलीस दलात दोन सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा […]
मुंबई : विशेष पोलीस आयुक्त नियुक्त करणे चुकीचे आहे, अशी विशेष नेमणुक करून देवेंद्र फडणवीस हे स्वतःची समांतर प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. ते म्हणाले, मुंबई पोलीस दलात आयुक्त हेच सर्वोच्च पद असताना विशेष पोलीस आयुक्त नेमून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली […]
रत्नागिरी : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची संपत्तीवर ईडीकडून जप्ती करण्यात आली आहे. अनिल परबांच्या साई रिसॉर्टप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली असून त्यांची एकूण 10.20 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. यासंदर्भात ईडीकडून ट्विटरद्वारे माहिती देण्यात आलीय. दरम्यान, या प्रकरणाशी माझा काही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद […]
पुणे : सध्या धर्मवीर नाव कोणीही कोणाला देतंय, तर काही जण चित्रपट काढत आहेत, धर्मवीर नाव कोणालाही देत आहेत. मात्र, स्वराज्यरक्षक दुसरं कोणाला म्हणता येणार नाही कारण, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांसारखा दुसरा कोणी होऊच शकत नसल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान, अजित पवार यांनी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक असा […]
मुंबई : आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आलीय. गेल्या काही दिवसांपासून देवेन भारती यांच्या बदलीची शक्यता वर्तवण्यात येत होती. विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्या नियुक्तीबाबत फडणवीस अनुकूल असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर देवेन भारती यांची नियुक्ती आता मुंबईच्या […]
पुणे : मी जे बोललोयं ते चुकीचं असल्याचं पटवून द्या, राजकारण सोडून देणार असल्याचं चॅलेंज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांना दिलंय. मला भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेते पद दिलेलं नसून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी दिल्याचं रोखठोक प्रत्युत्तरही त्यांनी दिलंय. ते पुण्यात आज पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मी कोणत्याही महापुरुषांबद्दल कधीच वादग्रस्त वक्तव्य […]
पुणे : मी काही इतिहास तज्ज्ञ नसून इतिहासकारांनी जे काही लिहिलंय ते मी सांगितलं, मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या विधीमंडळातील विधानावर अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेतही अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच असं संबोधलं आहे. […]
मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांकडून पुकारण्यात आलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. बैठकीत चर्चा सकारत्मक झाल्यानंतर संप मागे घेण्यात आल्याचं घोषित करण्यात आलं आहे. मुंबईसह राज्यातील निवासी डॉक्टरांकडून विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांच्या बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी संवाद […]
सोलापूर : काही दिवसांपासून चर्चेत असलेली नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नावानं आता थाळी सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. होय खरंय, सोलापुरातील नृत्यांगना गौतमी पाटीलच्या एका चाहत्याने आपल्या हॉटेलमध्ये गौतमी पाटील थाळी सुरु केलीय. टेंभुर्णीमध्ये हॉटेल सुमनमध्ये नृत्यांगना गौतमी पाटील थाळीचा आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहे. या थाळीची विशेषत: म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या हस्तेच हॉटेल […]
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांना गोब्राह्मण प्रतिपालक असे का म्हणतात? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ते आज पुण्यातून बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात घमासान सुरु झालंय. विरोधकांकडून राज्यभरात आंदोलन करीत अजित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी […]