अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
पुणे : छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर बोललं तरी वावगं ठरणार नसून ज्याला स्वराज्यरक्षक म्हणायचे आहे त्यांनी म्हणावं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच असं विधान केलं होतं, त्यावरून राज्यात विरोधकांकडून आंदोलने सुरु आहेत. त्यानंतर आता शरद पवार […]
मुंबई : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली वाहिलीय. तडफदार नेतृत्व काळाने हिरावले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रध्दांजली वाहिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण-समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला, असं म्हंटलंय. तसेच आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी -चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास […]
पुणे : शंभर रुपये दिले नाही म्हणून एका विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पाषाण परिसरात घडलीय. 31 डिसेंबरच्या रात्री एका हॉटेलमध्ये दोघे मित्र जेवणासाठी गेले असताना फुटपाथवर ही घटना घडलीय. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंकज तांबोळी असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून तो अहमदनगरमधील […]
सिंधुदुर्ग : स्वत:च्या सख्ख्या चुलत भावाचं घरासमोर डोकं फोडलं, त्यानंतर भावाला जाळून मारुन टाकल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर केला आहे. राऊत यांच्या गंभीर आरोपानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ते सिंधुदुर्गमधील कणकवलीत एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कारकीर्दीत अनेकांचा बळी गेला आहे. […]
धाराशिव : धाराशिवमधील परंडा तालुका म्हणजे कमी पावसाचा भाग. अशातच अर्थिक परिस्थिती जेमतेम तरीही संघर्षमय परिस्थितीतून पुढे येत शेतकऱ्याचा मुलगा उपजिल्हाधिकारी पदी विराजमान झाला आहे. शेतकऱ्याच्या मुलाला मिळालेल्या यशाबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्राद्वारे कौतुक केलंय. सावंत पत्रात म्हंटले, धाराशिवमधील परंडा तालुक्यातील लाकीबुकी येथील भास्करराव गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून सालगडी म्हणून कार्यरत आहेत. […]
पुणे : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज (ता.2 जानेवारी) बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध प्रकल्पांचा आढावा घेत कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पाटील यांनी आंबेडकर चौक वारजे ते महात्मा कॉलनी रस्त्याचा आढावा, एकलव्य कॉलेज ते मुंबई- पुणे रस्ता, बालभारती ते पौड फाटा रस्ता, पंचवटी ते पाषाण सुतारदरा रस्ता याबाबत आढावा घेतला. जनतेच्या सोयीसाठी राबवण्यात […]
ठाणे : छत्रपती शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त लिखाणाबाबत जेम्स लेन यांनी जे लिहिलंय त्यावर कोणी काहीच बोलत नाहीत, तसेच सावरकरांच्या सहा सोनेरी पानं आणि गोवलकरांच्या विचारधन पुस्तकात संभाजीराजांबद्दल वादग्रस्त लिखाण केलंय, त्याबद्दल माझ्याशी बोलण्याची कोणाची हिम्मत आहे का? असं खुलं चॅलेंज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या […]
पुणे : मागील अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मवीर असं संबोधलं आणि तुम्हीच म्हणताय की छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, अजित पवारांना नव्याने इतिहास शिकविला पाहिजे असल्याच टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. पाटील आज पुण्यात विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री चंद्रकात पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. विधी मंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्याचे विरोधी […]
मुंबईत विविध मागण्यांसाठी डॉक्टारांनी मोर्चा काढला आहे. यावेळी नवीन वरिष्ठ निवासी पदे लवकरात लवकर भरुन निर्वाह भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. मोर्चादरम्यान, आम्हांला न्याय द्या, अशा घोषणा डॉक्टरांकडून देण्यात आल्या. राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्यावतीने आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चादरम्यान, विविध मागण्या मान्य न केल्यास संपावर […]
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणं बरोबर असल्याची मत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना व्यक्त केलं आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक असून धर्मवीर नसल्याचं म्हणाले. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं चुकीचं असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं […]