अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
नागपूर : शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी भवनाबाहेर पोलिसांशी असभ्य वर्तन करुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं? आमदार नितीन देशमुख यांनी काल रवी भवनाच्या बाहेर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्कीसह त्यांनी पोलिसांशी अर्वाच्च […]
नागपूर : मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, कोणाच्या बापाची नाही, मुंबईवर अधिकार सांगितल्यास खपवून घेतलं जाणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या सभागृहात ठणकावून सांगितलयं. दरम्यान, कर्नाटकच्या काही मंत्र्यांनी मुंबईत 20 टक्के कन्नड भाषिक, मुंबईला केंद्रशासित करा, अशी मागणी केली. यावर भाष्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील मंत्र्यांचा चांगला समाचार घेतला आहे. ते म्हणाले, ज्यावेळी […]
नागपूर : कर्नाटकला असा ठराव करण्याचा अधिकार नसून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व राज्यांना मान्य करावा लागणार असल्याचं सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. ते म्हणाले, कर्नाटकची जमीन महाराष्ट्राला देणार नसल्याचा ठराव कर्नाटक सरकारने पास केला आहे, कर्नाटकला असा ठराव करण्याचा काहीही अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालायचा निर्णय सर्व राज्यांना मान्यच करावा लागणार असल्याचं त्यांनी […]
अहमदनगर : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत. शिंदे म्हणाले, भाजपचे खासदार बृज भूषण शरण सिंग यांची भेट घेऊन मनसे प्रमुख राज […]
नागपूर : विधान परिषदेत आज राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरातील पंढरपूर कॉरिडोरचा विषय मांडत असताना अमोल मिटकरी यांच्याकडून मोदींचा रावण असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतल्यानंतर मिटकरी यांनी लगेचच माफी मागितली आहे. दरम्यान, नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदींच्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली. कर्नाटकमधील म्हैसूरजवळील कडकोलामध्ये हा अपघात घडला आहे. अपघातात प्रल्हाद मोदींसोबत त्यांचे कुटुंबिय होते. या अपघातात सर्वजण जखमी झाले आहेत. पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी आपल्या कुटुंबियांसमवेत कारमध्ये बांदीपुरा इथं जात होते. त्याचवेळी त्यांची कार दुभाजकावर आदळून अपघात घडला. यावेळी त्यांचा […]
लखनऊ : तामिळनाडूच्या कन्याकुमारीमधून सुरु असलेल्या कॉंग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला महाराष्ट्रासह देशभरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. सध्या भारत जोडो यात्रा राजधानी दिल्लीत असून दिल्लीतून भारत जोडो यात्रा आता उत्तर प्रदेशात प्रवेश करणार आहे. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीची सत्ता असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात भाजपची चांगली मोट बांधून ठेवल्याची […]
अहमदनगर : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद भोसले यांच्यावर त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर आणि सलीम फ्रूटवाला यांच्यासोबत सय्यद यांचे आर्थिक संबंध आहेत. त्या अनेक वेळा दुबईला जातात. त्यांची चौकशी केली तर, त्यांचे पाकिस्तान कनेक्शन उघड होईल, असा गंभीर […]
बंगळुरु : चीननंतर आता भारतातदेखील कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. बंगळुरु येथील विमानतळावर चार प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आलीय. या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळाला नसून प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार बंगळुरु येथील विमानतळावर चार जण कोरोनाबाधित आढळून आले असून त्यांचं विलगीकरण करण्यात आलंय. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. देशातील सर्वच सरकारी […]
अहमदनगर : मंत्री चंद्रकांत पाटलांचे पुतळे जाळले असते तर काही नाही, मात्र, शाईफेकणं हिंसक वाटत, असल्याचं मत युवक कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलं आहे. लेट्सअपशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले, महाविद्यालयीन जीवनापासून मी आंदोलनातच आहे. महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने मला सांगितलं की, तुझं चार वर्षांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण आठ वर्षांत पूर्ण […]