अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीपुढे गुडघे टेकवण्याशिवाय दुसरं काय येणार नसल्याची खरमरीत टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलीय. ते मुंबईतून पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीपुढे गुडघे टेकवत आहेत, त्यांना गुडघे टेकवण्याशिवाय दुसरं काही येणार नाही. महाराष्ट्रात बेरोजगारी, सीमाप्रश्न, […]
जळगाव : नुकतीच जळगाव जिल्हा दुध संघाची निवडणुक पार पडली. या निवडणुकीत एकनाथ खडसे विरुद्ध मंत्री गिरीश महाजन , पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांचे पॅनल होते. चुरशीच्या लढतीत गिरीश महाजन यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला. दरम्यान, निवडणुकीत पैशांची उधळपट्टी होत असल्याच्या चर्चांना उधाण असतानाच भालोद गावातील निवडणुकीच्या पैशांच्या वाटणीवरुन वाद सुरु असल्याचा व्हिडिओ […]
नागपुर : उध्दव ठाकरे साहेब आणि मी उद्या नागपूरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलाय. ते म्हणाले, शिवसेना एकच असून ती शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करते. बाहेरचं वातावरण, शिवसैनिक महिला आघाडी सर्व जागेवर आहेत, दोन चार दलाल ठेकेदार गेले आहेत. बाकीचे कोणी नाही गेले. उद्या आमचं सरकार […]
तनपुरेंनी मटक्यावाले, वाळुमाफीया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक घेऊन काढलेला मोर्चा जनक्षोभ कसा? थोड थांबा तनपुरे २०२४ ला राहुरी मतदारसंघातला हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार राम सातपुते यांनी दिलाय. अहमदनगरमधील ब्राम्हणी धर्मांतरण प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची बदली करण्यात आली. धर्मांतर प्रकरणात लक्ष दिलं नसल्याचा आरोप […]
मुंबई : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आल्यानंतर राज्यात या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सत्ताधारी सरकारला चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्यावतीने कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामधील प्रमुख मागणी ही कर्नाटक-महाराष्ट्र सीमासंदर्भात होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजलाय. महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या बेळगाव वादाचा […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात अभिनेता सुशांत सिंह राजपूतची सेक्रेटरी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावर राजकीय नेत्यांकडून अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात येत आहेत. विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील भाजपच्या विधानसभा सदस्यांकडून हा मुद्दा जोरदार उचलून धरला असून दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याबाबत मागणी करण्यात आली. या मागणीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
नागपूर : हिवाळ अधिवेशानाच्या चौथ्या दिवशी झालेल्या गदारोळाचे पडसाद उमटत असताना आज पाचव्या दिवशीही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रती सभागृह उभे करुन आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ताधारी सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आले आहे. यावेळी विधान भवनाच्या पायर्यांवर प्रती सभागृह भरवून महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, माजी […]
नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. पंतप्रधान मोदींच्या कोरोना आढावा बैठकीच्या एका दिवसानंतर एक महत्त्वाचा निर्णय घेत सरकारने इंट्रानोजल कोरोना लसीला मंजुरी दिली. भारत बायोटेकची ही नाकातील लस आजपासून बूस्टर डोस म्हणून वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही लस केवळ खासगी रुग्णालयांमध्येच उपलब्ध […]
अहमदनगर : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शिर्डी येथे साईबाबांचं समाधीच दर्शन घेतले आहे. यावेळी पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला आहे. मुंडे म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर जागतिक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राजकारण हा विषय सर्वत्र असतो. प्रत्येक क्षेत्रात राजकारण चालते. मात्र ते सकारात्मक केले पाहिजे. […]
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे यांचा तीन महिन्यातील हा दुसरा दौरा असल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आलंय. तर एकीकडे हा दौरा पक्षसंघटनेसाठी असल्याचं बोललं जात असतानाच ठाकरे नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान कोणाशी भेट घेणार का? […]