अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
पुणे : चंद्रकांत पाटील हे शक्तिमान गृहस्थ आहेत. ते कोल्हापूरवरून कोथरूडला आले आहेत. त्यांचं कोथरूडसाठी काय योगदान आहे हे कोथरूडकरांना विचारलेलं बरं, ज्यांची आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातून निवडून येण्याची क्षमता नाही त्यांच्याबद्दल काय बोलावं, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं. त्यांनी आज महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या शिवराज राक्षे यांचा आपल्या घरी […]
नाशिक : नाशिक पदवीधर मतदासंघात दररोज एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. आज नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज केलेले धनराज विसपुते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अपक्ष उमदेवार धनराज विसपुते यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन भाजपकडून आपल्याला पाठिंबा मिळावा, अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप भाजपकडून कोणत्याही उमदेवाराला अधिकृतपणे जाहीर पाठिंबा […]
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आलेल्या धमकीप्रकरणी अखेर धमकी देणाऱ्या व्यक्तीचा छडा पोलिसांनी लावल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यामांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी या धमकी प्रकरणाची हकिकत मांडली. ते म्हणाले, मंत्री नितीन गडकरी यांना आलेली धमकी आम्ही गांभीर्याने घेतली असून त्या कॉलचा शोध घेण्यात आला. धमकीप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा […]
पुणे : कोयता गॅंग का फोयता गॅंग, मला ते चालणार नसून अशा घटना खपवून घेणार नसल्याचा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी पुण्यात घडलेल्या घटनांवरुन अजित पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, पुण्यासह बारामती आणि बाहेर जिल्ह्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्यांना इथं सुरक्षित वाटलं पाहिजे. त्यांच्यावर कोणीही […]
पुणे : पुण्यातील विश्रांतवाडीतील आरटीओ कार्यालयातील जप्त केलेल्या वाहनांना आग लागल्याची घटना घडली. ऐन मकसंक्रातीच्या दिवशी वाहनांना आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडालीय. या आगीत तब्बल दहा वाहने जळून खाक झाली आहेत. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज मकरसंक्राती आणि रविवार असल्याने आरटीओ कार्यालयाला सुट्टी होती. ही आग नेमकी कशामुळे लागली, याची […]
अहमदनगर : महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे जेव्हा संगमनेरला आले तेव्हा त्यांनीच सत्यजीत तांबे यांचं नाव सर्जेराव ठेवल्यासंदर्भातलं एक पत्र सत्यजीत तांबे यांनी ट्विट केलंय. ‘सर्जेराव’ नावाने ट्रोल करण्यावरुन तांबे यांनी एक ट्विट करत या नावामागचा खुलासा केला आहे. लहानपणी मला थोर माणसांच्या सह्या गोळा करण्याची फार आवड होती. संगमनेरला ज्या अकोलकर वाड्यात माझा जन्म झाला […]
मुंबई : एरवी कधीही न बोलणारे दिलीप वळसे पाटील सत्यजित तांबे यांच्या डबल गेमवर बोलले आहेत. ट्विट करुन त्यांनी भाजपला डिवचलंय. पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल त्यांनी ट्विटरद्वारे केला आहे. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही, तर दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल […]
अहमदनगर : काॅंग्रेस नेते सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर ते काय भूमिका घेणार, याची उत्सुकता असतानाच त्यांनी काॅंग्रेस मधील मित्रांना शुभेच्छा देत आपले जुने दोर कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे काॅंग्रेसमधील मित्र, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत बंडानंतरचे आपले पहिले ट्विट केले आहे. अर्थात या ट्विटवर तांबेना अनेकांनी ट्रोल केले आहे. काही […]
मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 30 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळात तांबे पिता-पुत्रांचा एक प्रकारे ड्रामा पाहायला मिळाला. नाशिक पदवीधरसाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सुधीर तांबे यांनी कॉंग्रेसकडून आपला अर्ज न भरता मुलगा सत्यजित तांबे यांचा […]
नाशिक : नाशिकच्या सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावरुन जात असताना पाथरेजवळ बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या संख्येचा अधिकृत आकड्याची माहिती अद्याप समोर आलेली नसून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहित मिळत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात बस आणि ट्रकचा चक्काचूर झाल्याचं […]