ठाणे : खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजपकडून जोर लावण्यात येत असल्याचं दिसून येतंय. आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा कल्याण दौरा होता. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री ठाकूर म्हणाले,महाराष्ट्रात डबल इंजिनची ताकद आणखी वाढणार असून ज्यांना डबल इंजिन सरकार जाणार असल्याची आशा आहे, त्यांना […]
औरंगाबाद : गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत महाविकास आघाडीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. महाविकास आघाडीचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली आहे. यामध्ये डोणगावकर यांचा पॅनल जिंकला आहे. निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना मोठा धक्का बसला आहे. गंगापूर साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवारी मतदार पार पडलं असून एकूण 54 टक्के मतदान झालं. तर […]
पहाटेच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या धक्कादायक गौप्यस्फोटामुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर सुरु झालंय. भाजपकडून शरद पवार साहेब तुम्हाला सत्य आणि असत्याबद्दल बोलण्याचा अधिकारच नसल्याचा टोला लगावण्यात आलाय. तर राष्ट्रवादीकडूनही भाजपच्या या ट्विटला प्रत्युत्तर देण्यात आलंय. दोन्ही पक्षांचे ट्विट पाहता शाब्दिक युध्द झाल्याचं दिसून येत आहे. पवार साहेबांच्या उत्तुंग कर्तृत्वाला तुमच्या पोचपावतीची […]
पुणे : माझ्यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त आहे, माझ्या पाठीवर चाळीस वार करण्यापेक्षा समोरुन एक वार करुन पाहाच, अशी डरकाळी शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी फोडलीय. प्रचारसभेत बोलत असताना ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांना थेट ललकारल्याचं दिसून आलं आहे. पुण्यातील विधानसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास […]
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टाकलेली नवी गुगली नो बॉल असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. दरम्यान, पहाटेच्या शपथविधीवरुन राज्यात राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी सुरु असल्याची परिस्थिती आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. आता त्यावरुन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी फडणीसांवर टीकास्त्र सोडले आहे. तपासे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी गुगली देवेंद्र फडणीसांनी […]
मुंबई : अजित पवार यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्यावेळी घेतलेल्या शपथविधीवरुन आजही वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यावरुन अजित पवार यांना लक्ष्यही केले जाते. त्यात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच पहाटेचा शपथविधी झाल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात राष्ट्रवादीसोबत […]
पुणे : राज्याचे गृहमंत्रीच आक्रमक व्हायला लागले, तर मायबाप सरकार कसं असेल, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. सुळे एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, मी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खूप हुशार समजत होते, मात्र राज्याचे गृहमंत्रीच आक्रमक होत असतील तर मायबाप सरकार […]
पाकिस्तानात मागील दहा दिवसांपासून सुरु असलेली आएमएफची बैठक निष्फळ ठरली आहे. कारण पाकिस्तानला मोठी आशा असलेल्या बैठकीनंतर आएमएफची टीम पाकिस्तानला कर्ज न देताच माघारी परतली आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर मोठं आर्थिक आव्हानच उभं राहिल आहे. एसबीआय पाकिस्तानच्या तिजोरीतील 3 फेब्रुवारीपर्यंतचा परकीय चलनाचा साठा 2.91 अब्ज डॉलवर आला आहे. त्यामुळे आता आएमएफकडूनही कर्ज मिळण्याची आशाही मावळली आहे. […]
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अद्याप राज्यसेवा परिक्षेच्या निर्णयाबाबत स्पष्टपणे जाहीर करण्यात आले नसून कृषी, वन, अभियांत्रिकीच्या परिक्षा वर्णनात्मक पध्दतीने २०२३ होणार असल्याचं जाहीर केलंय, त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. आयोगाने तत्काळ प्रसिध्दीपत्रक काढून संभ्रम दूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलीय. याबाबत पत्र […]