मुंबई : 26/11 च्या हल्ल्यातील अतिरेक्यांनी केलेला गोळीबार मी डोळ्यांनी पाहिला असल्याचं उद्योजक गौतम अदानी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. यावेळी त्यांच्यावर कोणता प्रसंग आला होता त्याचं वर्णनही त्यांनी यावेळी केलं आहे. 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईतील ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला. हा हल्ला आत्तापर्यंतचा अतिरेक्यांचा सर्वात मोठा हल्ला मानला जातो. या हल्ल्यात जवळपास 166 […]
पुणे : आता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांना मिळणार दुप्पट अनुदान मिळणार असल्याची माहिती वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, चित्रपटांच्या अनुदान नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अ, ब, क, ड अशी वर्गवारी करण्यात आली. यापुढे थीम आधारित चित्रपटांना अनुदान देण्याचा आपण निर्णय करत आहोत. […]
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अमृत सागर दूध संघाची निवडणूक आज झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला धूळ चारत माजी आमदार वैभव पिचड यांच्या पॅनलने विजय मिळविला. त्यांच्या पॅनलने 15 पैकी 13 जागांवर विजय मिळविला. मागील वर्षी अगस्ती सहकारी साखर कारखाना व राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना चाळीस वर्षांची सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे अमृत सागर […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या मांजरधाव प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने स्वतःच्या जागेवर डमी शिक्षकाची नेमणूक केल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आलाय. विशेष म्हणजे दोन वर्ष हा प्रकार सुरू असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात येतंय. जिल्हा परिषदेचे शिक्षक बाजीराव पानमंद यांनी आपल्या जागी एक खासगी बेरोजगार युवक कुलदीप जाधव याला शाळेत पाठवून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नेमणूक केली. ग्रामस्थांनी […]
पुणे : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पतंगराव कदम त्या काळात आमचे खंदे समर्थक होते, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलंय. पुण्यात आज पतंगराव कदम यांच्या जन्मदिनी त्यांच्या नावे पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी सिरम इन्सस्टिट्युटचे अदर पुनावाला यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री […]
पुणे : पतंगराव कदम एक जिंदादिल व्यक्तिमत्व होते, असं वक्तव्य आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DevendraFadnvis) यांनी एका कार्यक्रमात केलंय. पुण्यात आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम(Patangraokadam) यांच्या जन्मदिनानिमित्त भारती विद्यापीठात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सिरम इन्सस्टिट्युटचे (Serum Institute) अदर पुनावाला यांना कोरोना काळात चांगली कामगिरी केल्याबद्दल ‘पतंगराव कदम’ पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात फडणवीस […]
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान सुरु असल्याचं दिसंतय. विरोधी पक्षाचे नेते अजित पवारांचं(AjitPwar) छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विधीमंडळात ‘स्वराज्यरक्षक’ (swarajyarakshak)असा उल्लेख केला होता. त्यावरुन विरोधकांकडून राज्यभर या वक्तव्याचे पडसाद उमटले. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendraavhad) यांनी देखील यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(chandrashekharbavankule) […]
लातूर : जन्मादात्या आईनेच तीन महिन्याच्या मुलीचा गळा घोटल्याची घटना संतापजनक घटना लातूर जिल्ह्यात घडलीय. या महिलेला पहिली मुलगी होती, दुसऱ्यांदाही तिला मुलगी झाल्याने तिने तीन महिन्याच्या बाळाची गळा दाबून हत्या केलीय. या प्रकरणी निर्दयी आईविरोधात गातेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय? रेखा किसन चव्हाण असं या निर्दयी आईचं नाव […]
जवळपास एक वर्षांपासून सुरु असलेल्या रशिया-युक्रेनमधील युध्द अखेर थांबण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युद्ध थांबवण्यासाठी चर्चेची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, पुतीन यांनी युध्द थांबविण्याची तयारी दाखवली असून काही अटीही घातल्या आहेत. यासंदर्भात रशियाच्या सरकारकडून माहिती देण्यात आलीय. विविध कारणांमुळे रशियाने युक्रेनवर लष्करी हल्ला चढविला. त्यांनंतर युक्रेन गुडघे टेकणार अशी […]
औरंगाबाद : आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करत असलो तरी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना असल्याचं शिंदे-फडणवीस सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठणकावून सांगितलंय. तसेच निवडणूक आयोगाने आम्हांला बाळासाहेबांची शिवसेना नावाने मान्यता दिली असून आम्ही म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना असंही ते म्हणाले आहेत. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या गटातील आमदारांचा उल्लेख शिंदे गट असा उल्लेख […]