माजी खासदार सुजय विखे यांनी दिलेल्या चॅलेंजनंतर खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत इंग्रजीतून शपथ घेत पूर्ण करुन दाखवलंय. लंके यांनी राजकीय खुन्नसपोटी हा सगळा पराक्रम केला की काय? अशी चर्चा रंगलीयं.
राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार येणार, असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत बोलत होते.
लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतलीयं, मात्र काही खासदार शपथविधीला मुकले आहेत. यामध्ये अमृतपाल सिंह, अफजल अंसारी यांच्यासह इतर पाच जणांनी शपथ घेतली नाही.
मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी राज्य सरकारने आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीयं.
नारायण राणे यांनी खासदारकीची शपथ घेताच निलेश राणेंनी नगरसेवक ते खासदारपदापर्यंतचा प्रवास सांगत पदे सहज आली नसल्याचं म्हटलंय.
झालं गेलं सोडा, ओबीसी-मराठा बांधवांनी पटवून घ्यावं, असा पवित्रा मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनानंतर घेतलायं.
तू सरळ बोल, आमच्यात काडी लावतोयं का, पण मी लय पुढचा असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा छगन भुजबळांवर निशाणा साधलायं.
आरक्षण असूनही भांडणं करायची तयारी, मग आम्हाला नाही तर आम्ही किती तयारी दाखवू, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी ओबीसी बांधवांना दिला आहे.
नाशिक विधानपरिषद मतदारसंघात 5 हजार रुपयांचे पाकिटं पोलिसांकडून जप्त करण्यात आली असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मनोज जरांगे यांची मागणी इनलॉजिकल, त्यांचा सल्लागार कोण? कळतच नाही, या शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचे वाभाडेच काढले.