पोलिसांच्या बंदुकीत 24 गोळ्या होत्या; जीवघेण्या हल्ल्यानंतर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया

पोलिसांच्या बंदुकीत 24 गोळ्या होत्या; जीवघेण्या हल्ल्यानंतर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया

Jitendra Awhad : हल्ला करणारी तीनच पोरं होती, पोलिसांच्या बंदुकीत 24 गोळ्या होत्या, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हल्ला झाल्यानंतर दिलीयं. दरम्यान, संभाजी महाराज छत्रपती (Sambhaji Maharaj Chatrapati) यांच्या नेतृत्वाखाली विशाळगड अतिक्रमण मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यात आलं. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या विधानानंतर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना आव्हाडांनी इशारा दिला होता. अखेर आज ठाण्यात आव्हाडांच्या गाडीवर झाला. या हल्ल्यानंतर आव्हाडांनी माध्यमांशी संवाद साधला.

शेतकऱ्याचं पोर ते धोनीप्रमाणे रेल्वेत TC; भारताला कास्य जिंकून देणाऱ्या स्वप्नीलचा प्रेरणादायी प्रवास

जितेंद्र आव्हाड म्हणाले, संभाजी महाराज ज्या विचारांचे आहेत त्या विचारांचा मी नाही. तुमच्या वडिलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करणं. हल्ला झाला तेव्हा मी पुढे बसलो होतो, गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यानंतर पुढे जाऊन आम्ही थांबलो मग हे उलटे फिरले, हे तीनच पोरं होती, पोलिसांकडे चार बंदुकी होत्या, त्यामध्ये 24 गोळ्या होत्या, या शब्दांत थेट इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिलायं.

IPL 2025 साठी नाही होणार मेगा लिलाव, शाहरुख खान का संतापला? वाचा, बैठकीची Inside Story

लोकांनी माझ्या गाडीवर हल्ला केलायं, अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला केलायं, म्हणून बोलणार नाही, असं नाही, आता तर मी आणखी क्लेषाने बोलणार असून आत्तापर्यंत मी खूप आदर करायचो पण आता नाही, तुम्ही जेव्हा अतिक्रमण तोडलं तिथं फक्त मुस्लिम राहत नाही तर हिंदूही राहतात ते गुण्यागोविंदाने राहतात. कोल्हापुरच्या पौराणिक मशीदीच्या बाहेर गणपतीची मुर्ती आहे ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

Waynad Landslide : वायनाड भूस्खलनात मृतांचा आकडा वाढला; 205 निष्पाप जीवांचा बळी

संभाजीराजेंचा फायदा संभाजी भिडे यांनी घेतला आहे. तुम्ही विचारांनी चुकले आहात तुम्ही रक्ताचे वारसदार आहात आमही विचारांचे आहोत. तुमचे वडील खासदार झाल्याची आग तुमच्या मनात जळत आहे. ही आग तुम्हाला लागलीयं, त्यामुळेच तुम्ही बेताल वक्तव्य करीत आहात तुम्हा आता स्वत:ला छत्रपती म्हणणं सोडून द्यावं, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube