निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बारामतीत एकूण ५६.९७ टक्के मतदान झालं आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानात काहीशी घट झाली आहे. २
राज्यात आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर हे आज कोपरगाव येथे सभा घेणार आहेत.
टी 20 विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिज या देशात होणार आहे. आयर्लंड आणि पापुआ न्यू गिनी या संघांच्या घोषणा झाल्या आहेत.
शरद पवारांच्या वक्तव्यात तथ्य आहे. त्यांच्यासारखे मोठे नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी दूरवरचा अभ्यास करूनच बोलत असतात.
ज्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे सीएम आणि देशाचे पीएम सुद्धा नव्हते त्यावेळी सुद्धा गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी करत होता.
आपण चांगले कलाकार आहात. अभिनेते आहात. आपल्या वचननाम्यात आपण मतदारसंघात चित्रपटसृष्टीची घोषणा केली होती. चित्रपटसृष्टी राहू द्या पाच वर्षात एखादं नाट्यगृह तरी सुरू केलं का?
नगर शहरातील माऊली संकुल सभागृह येथे निर्भय बनो, सकल भारतीय समाजाच्यावतीने निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष एकवटतील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवार यांनी एका मुलाखतीत केलं.
भुसावळ येथील सभेत फडणवीस भाषण करत होते. त्यावेळी अचानक लाईट गेली. त्यावेळीही फडणवीसांनी भाषण थांबवलं नाही.