लेट्सअप मराठीमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. गेल्या तेरा वर्षांपासून पत्रकारितेत. रिपोर्टर व उपसंपादकपदाची जबाबदारी, राजकारण, शेतीविषयक वार्तांकनात विशेष आवड.
Beed News : राज्यात आता निवडणुकांचे वारे वेगाने वाहत आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. मतदारसंघांचीही चाचपणी सुरू आहे. तर दुसरीकडे इच्छुकांकडून तिकीटासाठी आतापासूनच फिल्डिंग लावली जात आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेशही दिले आहेत. बीडमध्येही (Beed) राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. माजी आमदार बदामराव पंडित यांनी तर कार्यकर्त्यांना तंबीच देऊन टाकली […]
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मंत्रालयासंबंधी कॅगने (CAG Report) आपल्या अहवालात काही गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. ज्यामुळे गडकरी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा सगळा प्रकार गडकरींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यांच्या या टीकेवर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले. बावनकुळे […]
Chandrashekhar Bawankule : सामनाच्या अग्रलेखातून आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आल्याने भाजपाचे नेते कमालीचे संतापले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही कठोर शब्दांत ठाकरे गटाचा समाचार घेतला. सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर जी टीका करण्यात आली. त्या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. सामना ज्या पद्धतीने आग ओकत आहे, ती आग थांबवावीच […]
Rajasthan Election : केंद्रातील सत्ताधारी भाजपला (BJP) सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी झाली. आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. मात्र, त्याआधीच या आघाडीला धक्का देणारी आणखी एक बातमी आली आहे. ‘आप’ इंडिया (INDIA) आघाडी सोडून राजस्थानात (Rajasthan Election) स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. पक्षाचे राजस्थान प्रभारी विनय मिश्रा यांनीच ही माहिती दिली […]
Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी मोहित कंबोज (Mohit kamboj) यांनी न्यायालयाला विनंती केली. तशी बातमी छापून आली. या प्रकाराची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाल्यानंतर मोहित कंबोज यांनीच खुलासा केला आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका,वृत्तपत्रातील बातमी पूर्णपणे खोटी आहे. मी नवाब मलिक यांच्या विरोधातील मानहानीची केस मागे […]
Devendra Fadnavis : ठाकरे गटाने राज्य सरकारवरील हल्ले आधिक तीव्र केले आहेत. फडणवीस, सांभाळा!, या शीर्षकाखालील सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका करण्यात येऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते. पण, ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली आणि ते अहंकाराचे महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ […]
Antim Panghal : भारताची महिला कु्स्तीपटू अंतिम पंघाल (Antim Panghal) हीने जबरदस्त कामगिरी करत इतिहास रचला. वीस वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेतील 53 किलो वजन गटात विश्वविजेता होण्याचा पंघालने मिळवला. सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचाही मान तिने मिळवला. जागितक कुस्ती स्पर्धेच्या (World Wrestling Championship) अंतिम सामन्यात अंतिम पंघालने युक्रेनच्या मारिया येफ्रेमोवा हीचा 4-0 असा पराभव करत पहिल्या […]
IND vs IRE : वेस्टइंडिज विरुद्धची टी 20 सामन्यांची मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने (IND vs IRE) पुन्हा एकदा विजयी वाटचाल सुरू केली आहे. भारतीय संघाने पहिल्या टी 20 सामन्यात आयर्लंड (Ireland) संघाचा अवघ्या दोन धावांनी पराभव केला. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. बराच वेळ पाऊस सुरू होता. अखेर पंचांनी डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे निकाल […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या फोटोचा वापर केला जात आहे. त्यावरून अनेकदा दोन्ही गटाने एकमेकांवर टीका केली आहे. माझा फोटो वापरल्यास न्यायालयात खेचण्याचाही इशारा शरद पवार यांनी दिला होता. तरी देखील काहीच फरक पडला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रतोद व मदत व पुनवर्सन […]
Maharashtra Politics : सध्याच्या राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही (Ajit Pawar) सहभागी आहेत. तरीदेखील या सरकारला महायुतीचे सरकार म्हटले जात आहे यावरून काँग्रेसने (Congress) या सरकारची खिल्ली उडविली आहे. या संदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. त्यांनी अंदाज अपना अपना या हिंदी सिनेमातला एक सीन ट्विट करत सरकारवर निशाणा साधला […]