AAP : राजधानी दिल्लीतील अबकारी धोरण प्रकरणात चौकशीसाठी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सीबीआयची नोटीस मिळाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज केजरीवाल यांना दुसरा झटका बसला आहे. गुजरातमधील सूरत महापालिकेतील (SMC) आणखी 6 नगरसेवकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. सूरतमध्ये पक्षाच्या सहा नगरसेवकांनी राज्याचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आतापर्यंत 27 पैकी 10 […]
Delhi Liquor Policy : राजधानी दिल्लीतील अबकारी धोरण प्रकरणात (Delhi Liquor Policy) कथित घोटाळ्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने आता थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीआयच्या वतीने केजरीवाल यांना समन्स पाठविण्यात आले आहे. त्यांना येत्या रविवारी (दि.16) चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. […]
Yashomati Thakur : राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील विधवा महिलांना गंगा भागिरथी शब्द वापरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या या प्रस्तावावर राज्यभरात प्रचंड गदारोळ उठला. विरोधकांनी टीकेची झोड उठविली तर खुद्द सत्ताधारी गटातही मतभेत असल्याचे दिसून आले. आता माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीही याबाबत […]
Rajasthan Politics : काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी त्यांच्याच सरकारविरोधात केलेल्या उपोषणानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या आंदोलनानंतर काँग्रेसमध्ये (Congress) घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. पक्ष पुन्हा एकदा दोन गटात विभागल्याचे दिसत आहे. त्यामुळे या संकटातून मार्ग काढण्यासाठी पक्षाने ज्येष्ठ नेते तथा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांना मोठी जबाबदारी दिली […]
Amravati : बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला झटका देणारी घटना घडली आहे. ज्या भाजपने देशाला काँग्रेसमुक्त करण्याचा विडाच उचलला आहे त्याच भाजपने चक्क काँग्रेसला बळ देणारे काम केले आहे. एरव्ही हे दोन्ही पक्ष एकमेकांचे हाडवैरी. दोघांत विस्तवही जात नाही. नेते तर एकमेकांवर अगदी खालच्या भाषेत टीका करतात. मात्र, अमरावतीत बाजार समितीच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी […]
Nana Patole on Bawankule : ‘काँग्रेस पक्ष संपला आहे, तो दुर्बिणीतूनही दिसत नाही, राहुल गांधींना गांभिर्याने घेण्याची गरज नाही म्हणणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना राहुल गांधींवर (Rahul Gandhi) बोलल्याशिवाय झोप लागत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला चोख उत्तर देऊ शकणारे देशात आज राहुल गांधी हेच एकमेव नेते आहेत. राहुल गांधींना भाजप व मोदी घाबरतात म्हणून तर […]
Karnataka Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकांची (Karnataka Elections) घोषणा झाली असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून यंदा काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. दुसरीकडे भाजपनेही सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनंतर भाजपनेही उशीरा का होईना पण उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत […]
Arvind Sawant : महाविकास आगाडीच्या वज्रमूठ सभा राज्यात सुरू आहेत. या सभांमधून महाविकास आघाडी अभेद्य असल्याचा दावा करत सत्ताधारी भाजपवर जोरदार प्रहार केले जात आहेत. या सभांना गर्दीही होत आहे. त्यामुळे भाजप सावध झाला असून या सभांवर टीकांचे सत्र सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या सभांवर टीका करत भेगा पडलेला वज्रमूठ असे म्हटले होते. […]
Nana Patole : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसबाबत केलेल्या विधानामुळे वाद होण्याची शक्यता दिसत आहे. काँग्रेसमध्ये कुणीही राहण्यास तयार नाही. अख्खा काँग्रेस पक्ष आपल्या पाठिशी येत आहे त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी समाचार घेतला आहे. पटोले म्हणाले, ‘केंद्रात […]
NCP News : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्याच्या मोठ्या धक्क्यानंतर आणखी एक झटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. कारण राजधानी दिल्लीत पक्षाला मिळालेला बंगला काढून घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दिल्ली सरकारकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांना तशी नोटीस बजावली जाण्याचीही शक्यता असल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांना मिळालेले मिळालेले […]