देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपचे नेते राहतील असं पुन्हा एकादा स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
मराठा आरक्षणावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यावर मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
आत्महत्येचं सत्र काही कमी झालेलं नाही. आज मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
आसाममधील आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटांतच आत्महत्या केली.
ओबीसी आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाके यांच्या अमरण उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांच्या जिवाला धोका असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत.
तापमानाने उच्चांक गाठला आहे. यामध्ये उष्णतेमुळे 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. इजिप्तमधील सुमारे 323 हज यात्रेकरुंचा समावेश आहे.
टी-२० विश्वकरंडकातील साखळी फेरीच्या लढतीत आता पहिल्यांदाच सहभागी होत असलेल्या अमेरिकन संघाच्या रडारवर दक्षिण आफ्रिकन संघ असणार आहे.
अमेरिकेच्या माजी सभागृह सभापती नॅन्सी पेलोसी या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्या तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेणार आहेत.
पुणे कार अपघाताची घटना ताजी असतानाच चेन्नईतही अशीच घटना घडली. खासदाराच्या मुलीने आपल्या BMW कारने झोपलेल्या लोकांना चिरडलं.
महाराष्ट्रात मॉन्सून सध्या जोरदार असल्याचं दिसतय. मात्र, पुढे सरकण्याची त्याची गती संथ झाली असल्याचं मत हवामान विभागानं नोंदवलं आहे.