भारतीय महिलेने कुवेतमध्ये कामगार म्हणून काम करताना काय वागणूक मिळते याबद्दलची विदारक परिस्थिती काय आहे हे सांगितल आहे.
यावर्षी तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं असल्याने मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात पाणीसाठ्यात मोठी घट झाली. तर काही शुन्य टक्क्यावर आले.
राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आता आपली मंत्रिपदी वर्णी लागणार का? असा प्रश्न विचारला असता मिळाली संधी तर सोनं करेल असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांच्या तयारीला लागलो आहोत असं वक्तव्य केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील वसीम मोहम्मद उर्फ वसीम चिकना याला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्यासाठी रेकी करत होता.
सांगली लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसचे सर्वजण एकत्र झालो. मात्र काहींना पाहवल नाही त्यांनी खडे टाकले असं विश्वजीत कदम म्हणाले.
मराठा आंदोलक यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चौकशी झाली. त्यामध्ये फडणवीसांनी एसआयटी रद्द केल्याचं म्हटलं आहे.
इटलीतील अपुलिया येथे जी ७ समूहाच्या शिखर बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रप्रमुखांशी विविध विषयांवर चर्चा केली.
मुंबईत विजय नगर परिसरात अपघाती घटना घडली. येते घराचे छत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.
मराठवाड्यात पूर्णवेळ एसडीआरएफ टीम नसल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव जातात. त्यामुळे आता त्याची मागणी होत आहे.