नवी दिल्ली : महुआ मोईत्रा यांनी समिती आणि समितीच्या अध्यक्षांबाबत असंसदीय शब्द वापरले. उत्तर देण्याऐवजी त्या प्रचंड चिडल्या, असा मोठा खुलासा संसदेच्या आचार समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी केला आहे. ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरण चौकशीवेळी सोनकर यांनी अत्यंत घाणरेडे प्रश्न विचारले असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सोनकर यांच्यावर केला होता. […]
जालना : सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत आहे. पण या दोन महिन्यांत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास आणि सरकारकडून दगाफटका झाला तर मराठे मुंबईच्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करतील. त्यानंतर आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना मुंबईचे दरवाजे बंद करतील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. आज (2 नोव्हेंबर) शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी […]
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. 2 जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास 3 जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही सुरु राहणार आहे, तसेच आपणही आपल्या […]
Arvind Kejriwal : दिल्ली दारु धोरण घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार आज (2 नोव्हेंबर) केजरीवाल यांना चौकशीला हजर रहायचे होते. मात्र, या प्रकरणात केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी ईडीच्या समन्सला केराची टोपली दाखवत नोटीस बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ईडीने पाठविलेली नोटीस बेकायदेशीर आणि राजकारणाने प्रेरित आहे. भाजपाच्या […]
पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे शिरुरचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हवेली तालुक्यासाठी (Haveli Taluka) लोणी काळभोर इथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज (2 नोव्हेंबर) जारी करण्यात आला आहे. स्वतः अशोक पवार यांनी समाज माध्यमातून याबाबत माहिती दिली. […]
पुणे : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हवेली तालुका (Haveli Taluka) प्रशासनावरील ताण आता कमी होणार आहे. हवेली तालुक्यासाठी लोणी काळभोर इथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज (2 नोव्हेंबर) जारी करण्यात आला आहे. शिरुरचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी समाज माध्यमातून याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार […]
मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करत मैदानात उतरले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. पण त्यांच्या आंदोलनाचा मार्ग चुकीचा आहे, या आंदोलनाला हिंसक वळण लागत असून न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती सदावर्ते यांनी […]
अलवर : ईडी (ED) अर्थात अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी नवल किशोर मीणा यांना 15 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. एका चिटफंड खटल्यात मालमत्ता जप्त न करण्यासाठी मध्यस्थामार्फत ही लाच मागण्यात आल्याचा दावा केला जात आहे. बाबूलाल मीना असं या मध्यस्थाच नाव असून त्याला लाचेच्या पैशांसह अटक करण्यात आली आहे. राजस्थान लाच लुचपत […]
Maratha Reservation : मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण, दगडफेक आणि जाळपोळ अशा हिंसक घटनानंतर मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काल (1 नोव्हेंबर) राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, यामध्ये ठोस झाला नाही. सरकारने वेळ देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या आंदोलनाची धग अद्याप कायम […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा यावर्षी 1 ऑगस्ट रोजी पुणे दौरा पार पडला. यावेळी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा सोहळा, मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडला होता. पण पंतप्रधान मोदी यांचा हाच दौरा पुणे महापालिकेला तब्बस दोन कोटी रुपयांना पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र […]