नवी दिल्ली : अखेर मागील अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या 18 व्या लोकसभेसाठी पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (16 मार्च) विज्ञान भवनात पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेसोबतच, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा केली. यानुसार एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान […]
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग आज (16 मार्च) आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. मात्र त्यापूर्वीच आयोगाने देशभरातील विविध राज्यांमधील सुमारे 1070 अपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकूण 18 उमेदवारांचा समावेश आहे. गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकातील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे आयोगाने या उमेदवारांना अपात्र ठरविले आहे. त्यामुळे आता […]
मुंबई : अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र केडरचे माजी IAS अधिकारी प्रवीणसिंह परदेशी आपल्या राजकीय इनिंगला प्रारंभ करणार आहेत. येत्या 20 मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. परदेशींनी नुकताच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशचे (मित्रा) सीईओ पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या […]
सांगली : काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या दोघांनीही लोकसभा (Lok Sabha Election) निवडणुकीपूर्वीच अर्धी लढाई जिंकली आहे. परंगपरागत काँग्रेसकडे (Congress) असलेला सांगली (Sangli) मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र या दोघांनीही दिल्लीपर्यंत धडका मारुन हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांच्या जीवात जीव आला आहे. […]
अखेरीस नको, नको म्हणत असतानाही भाजपने (BJP) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना जबरदस्तीने लोकसभेच्या घोड्यावर बसवले आहे. आता त्यांना टाच मारुन तो घोडा पळवावाच लागणार आहे. मी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढविण्यासाठी इच्छुक नाही. त्या दृष्टीने मी तयारी देखील केलेली नाही, मला राज्याच्याच राजकारणात रस आहे, ही गोष्ट ते विविध माध्यमातून पक्ष नेतृत्वाला वारंवार […]
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा बारामती एवढाच दुसरा हक्काचा मतदारसंघ म्हणजे माढा. 2009 मध्ये पंढरपूर मतदारसंघ जाऊन माढा मतदारसंघ तयार झाला. पहिल्याच निवडणुकीत स्वतः पवारांनीच मैदानात उडी घेतली. त्यानंतर 2014 मध्ये पवारांनी अत्यंत विश्वासू अशा विजयसिंह मोहिते पाटील यांना लोकसभेत पाठविले. 2019 मध्ये राजकीय समीकरणे बदलली, मोहिते पाटील घराण्याने भाजपचे कमळ […]
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी आणि भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने कंबर कसली आहे. भाजपने स्वबळावर 370 हून अधिक तर एनडीएने 400+ जागा मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर इंडिया आघाडीने मिळून भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला आहे. त्याचवेळी विविध सर्व्हेंमध्ये भाजपला काहीशी अनुकूल आकडेवारी आणि मतदान मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर […]
सांगली करुया चांगली… असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सांगलीतून संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सांगलीच्या जनतेनेही जवळपास 52 वर्षे काँग्रेसकडे असलेला गड भाजपच्या ताब्यात दिला. संजयकाकांनी तब्बल अडीच लाख मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला. 2019 मध्येही पुन्हा पक्षांतर्गत विरोध […]
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाविकास आघाडीवरच रोज होणारी टीका, आरोप, शेरेबाजी आणि जागा वाटपबाबत होणारे रोज नवीन दावे या सगळ्याला आता त्यांचा मित्रपक्ष असलेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच वैतागल्याचे दिसून येत आहे. यातूनच जर आंबेडकर आघाडीत येणार नसतील तर अकोल्यात त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याची तयारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackera) […]
दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों… हा शेर जर कुठे अगदी चपखल लागू होत असेल तर तो नांदेडमध्ये. नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे एकमेकांचे कडवट विरोधक. गेल्या जवळपास 25 वर्षांपासून दोघांमध्ये विळ्या-भोपळ्याचे राजकीय वैर. यात कधी अशोक चव्हाण वरचढ ठरायचे […]