मुंबई : राज्य सरकारने बीड, अहमदनगर, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या सात जिल्ह्यांमधील एकूण 13 साखर कारखान्यांना एक हजार 898 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या 13 कारखान्यांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नेत्यांच्या 12 आणि एका काँग्रेस नेत्याच्या कारखान्याचा समावेश असल्याने सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला […]
बारामती : यंदा बारामती जिंकायचीच, सुप्रिया सुळे यांचा पराभव करुन शरद पवार यांना चितपट करायचेच असा जणू चंग भाजपने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधला आहे. त्यासाठी अजितदादांनी मतदारसंघात जातीने लक्ष घातले आहे. मतदारसंघातील समीकरणे साधण्यावर ते भर देत आहेत. यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटीलही त्यांना मदत करत आहेत. दौंड, इंदापूर, पुरंदर इथले वाद मिटविण्यासाठी […]
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढणार याचे उत्तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर देखील अद्यापही गुलदस्त्यात आहे. कोण, किती अन् कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार या प्रश्नाचे उत्तर शोधताना पक्षाची आणि नेत्यांची पुरती हौस फिटताना दिसत आहे. मात्र या गोष्टीला महायुतीमधील भाजप आणि महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन पक्ष […]
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस की भाजप (BJP) नेमका कोणाचा उमेदवार मैदानात असणार? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेल्या उदयनाराजे भोसले यांच्या नावाची भाजपकडून चर्चा सुरु आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांच्या नावाची […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना यंदाची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकीर्दीमधील सर्वात अवघड ठरु शकते. एक तर दोघांनीही पक्षांमध्ये केलेले बंड, त्यानंतर पक्षनेतृत्वावर केलेले गंभीर आरोप आणि भाजपसोबत स्थापन केलेली सत्ता या दोन वर्षांमधील घटनांमुळे दोघांसाठी देखील ही निवडणूक नैतिकता सिद्ध करण्याच्या दृष्टीने […]
भाजप तिकीट जाहीर केलेल्या उमेदवाराला बदलणार का? उमेदवारी जाहीर केलेल्या नेत्याला “तुम्ही थांबा”, असे सांगायची नामुष्की भाजपवर (BJP) येणार का? भाजप ‘मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil ) आणि रामराजेंच्या’ (Ramraje Naik Nimbalkar) विरोधापुढे झुकणार का? असे अनेक सवाल सध्या माढा लोकसभा मतदारसंघात विचारले जात आहेत. या प्रश्नांमागील प्रमुख कारण म्हणजे रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट जाहीर […]
शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil). दोघेही एकेकाळचे एकमेकांचे जिवलग मित्र होते. या दोस्तीमुळेच संगणक क्षेत्रात अग्रगण्य उद्योजक असलेल्या आढळरावांचा राजकारणात सहज प्रवेश झाला. वळसे पाटील यांचे वर्चस्व असलेल्या भीमाशंकर कारखान्याच्या सुरुवातीच्या काळात आढळराव पाटील यांनी कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पहिले. वळसे पाटील 2000 मध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांचा […]
पुरंदर : बारामती लोकसभा मतदारसंघातील समीकरणे डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (16 मार्च) रोजी पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव (Dada Jadhavrao) यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत बराचवेळ चर्चाही केली. त्यानंतर दादा जाधवराव यांनीही अजित पवार यांना सुनेत्राताई पवार यांच्या विजयासाठी मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे अजितदादांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. (Deputy […]
जालना : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गेलेला सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Election) पुन्हा एकदा काँग्रेसकडे आला आहे. आता सांगलीच्या ऐवजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला काँग्रेसच्या (Congress) ताब्यातील जालना लोकसभा मतदारसंघ (Jalna Lok Sabha constituency) देण्यात आला आहे. मतदारसंघासोबतच काँग्रेसने संजय लाखे पाटील (Sanjay Lakhe Patil) यांच्यारुपाने उमेदवारही […]
देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दुपारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. यानंतरच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांना या आदर्श आचारसंहितेचे पालन करावेच लागते. यातही राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना या नियमांचे […]