नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी मतदारसंघातून (Dindori Lok Sabha) भाजपने (BJP) विद्यमान खासदार आणि केंद्रीय भारती पवार (Bharati Pawar) यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपमध्ये नाराज असलेले माजी खासदार हरिशचंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) यांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे. आज (14 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) […]
2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मोहिते पाटील घराण्याच्या मदतीमुळे रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांची माढा (Madha) लोकसभा मतदारसंघातून संसदेची वाट सुकर झाली होती, त्याच मोहिते पाटील घराण्याचा यंदा रणजीतसिंह यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता. त्यांच्या जोडीला गतवर्षी रणजीतसिंहांचे कडवट विरोधक असलेले रामराजे नाईक निंबाळकर आले. सांगोल्यातून माजी आमदार दीपक साळुंखेही दबक्या आवाजात […]
अहमदनगर : “लोकसभा निवडणूक लढण्याबाबत आमचे काहीही नियोजन नाही. माझे याबाबत कोणाशी काहीही अधिकृत बोलणे झालेले नाही. पण राजकारणात काहीही होऊ शकते”, असे म्हणत पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षप्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. लंके यांच्या कोरोना काळातील कामाच्या अनुभवांवर आधारित पुस्तकाचे पुण्यात आज (14 फेब्रुवारी) प्रकाशन होणार आहे. […]
विजयबापू शिवतारे विरुद्ध अजित पवार. एकमेकांचे सख्खे शेजारी पण पक्के वैरी. या दोघांमधील वैर महाराष्ट्राला परिचित आहे. शिवतारे अजितदादांना बारामतीचा टग्या म्हणायचे. बारामतीच्या या टग्याचे सगळे नट बोल्ट ढिल्ले करणार, असे ते जाहीरपणे म्हणायचे. शिवतारे यांच्याकडून या सातत्याने होणाऱ्या अतिकडवट टिकांना वैतागून अजितदादांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत “तु कसा आमदार होतो ते बघतो”, असे जाहीर […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा झटका देत इलेक्टोरल बॉन्डची (electoral bonds) माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला तात्काळ देण्याचे आदेश दिले आहेत. “आम्ही 15 फेब्रुवारी रोजी याबाबतचे आदेश दिले होते. तुम्ही 26 दिवस काय केले?” असा सवाल करत स्टेट बँक ऑफ इंडियाला न्यायालयाने कडक शब्दात फटकारले. यावर स्टेट बँकेने तीन […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे पक्षात येणार आहेत, याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. या चर्चा मला तुमच्याकडूनच ऐकायला मिळत आहेत, असे म्हणत लंके यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच पूर्णविराम दिला. ते पुण्यातील मोदीबाग येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत […]
बिजू जनता दल दुरावला, तेलगू देसम पक्ष दुरावला, शिवसेना दुरावली, अकाली दल दुरावला, जनता दल संयुक्त दुरावला, जनता दल धर्मनिरपेक्ष दुरावला… मागच्या एका तपापासून भाजपपासून अनेक मित्र पक्ष दुरावले. केंद्रातील दोनवेळा आलेली पूर्ण बहुमतातील सत्ता, अनेक राज्यांमध्ये वाढलेली कमालीची ताकद, इतर पक्षांमधून आलेले आणि स्थिरावलेले असंख्य नेते यामुळे मित्र पक्षांना संभाळून घेणे, नाराज झाल्यानंतर त्यांची […]
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात युतीतील वाद मिटविताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठी कसरत करावी लागत आहे. मागील आठवड्यात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये तिन्ही पक्षांच्या आजी-माजी आमदारांची मंत्रालयात बैठक पार पडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 17 आणि 18 मार्च […]
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या (Congress) तिकीटावर शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणाही लवकरच होण्याची शक्यता आहे. अशातच महायुतीकडून शिवसेनेचे (ShivSena) विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना थांबवून शिवसेनेच्या किंवा भाजपच्या तिकीटावर राजे समरजीतसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांना उमेदवारी देण्याबाबतची चाचपणी सुरु असल्याची […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील (Maharashtra) जागा वाटपाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तिन्ही पक्षातील कोणता पक्ष, किती आणि कोणत्या जागा लढवणार यावर अद्यापही एकमत झालेले नाही. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit […]