पुणे : तुमच्यासाठी भारतीय जनता पक्षाचा (BJP) कुठलाही कार्यकर्ता पुरेसा आहे. लोकसभेसाठी भाजपने कुठल्याही कार्यकर्त्याला अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिले तरी तो तुमचा पराभव करेल, असे म्हणत भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी काँग्रेस (Congress) आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या आव्हानातील हवाच काढली. ते पुण्यात बोलत होते. (Former BJP MLA Jagdish Mulik […]
पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे मागील आठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांच्या हमीभाव आणि इतर मागण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चांच्या फेऱ्या सुरु आहेत. काही मागण्यांवर एकमत झाले आहे तर काही मागण्यांवर तोडगा निघणे अद्याप बाकी आहे. हजारो शेतकरी या मागण्या मान्य होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. एका बाजूला हे पंजाब आणि हरियाणातील शेतकरी नाराज झाले असतानाच […]
अहमदनगर : शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणे, ही बाब फक्त मुंबई शहर व उपनगरांपुरती मर्यादित नाही. संपूर्ण राज्यातील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवले जात आहे. यातून राज्यभरातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यातील शिक्षकांसाठी हा आदेश देण्याची गरज आहे, अशी मागणी नाशिक पदवीधर विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet […]
मुंबई : मुंबईमधील सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून अखेर सुट्टी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांच्या सुचनेनंतर अप्पर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे स्पष्ट आदेश दिले आहे. मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करावे, […]
वाशिम : कारंजा विधानसभा मतदारसंघांचे भाजप (BJP) आमदार राजेंद्र पाटणी (Rajendra Patani) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. पाटणी हे दोन ते अडीच वर्षांपासून आजारी होते. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पाटणी यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) […]
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे आज (23 फेब्रुवारी) निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. काल (22 फेब्रुवारी) त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून दिली होती. मात्र उपचारादरम्यान, पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत […]
“त्यांना सर्व काही दिले. त्यांना आमदार केले, मंत्रिपद दिले, विधानसभा अध्यक्षपद दिले आणि साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पदही दिले. मात्र, त्यांनी पाच टक्केही निष्ठा राखली नाही. ते गेले. शरद पवार यांच्या मंचरमधील भाषणातील या एका वाक्यात एकाच वेळी दु:ख आहे, राग आहे आणि बदल्याची आगही आहे. हे दु:ख आहे ते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणे त्यांच्याच जुन्या सहकारी संगिता वानखेडे (Sangita Wankhede) यांना भोवले आहे. एका कार्यकर्त्याने वानखेडे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरातील निवासस्थानी जाऊन वानखेडेंना धमकावले असल्याची माहिती आहे. “तु राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात […]
नवी दिल्ली : भारत सरकारने आपल्याला काही पोस्ट आणि अकाऊंट्स डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत, असा दावा एक्स (ट्विटर) कडून करण्यात आला आहे. ग्लोबल गव्हर्नन्स अफेअर्स अकाऊंटच्या माध्यमातून एक्सने हा दावा केला आहे. मात्र भारत सरकारच्या (Government of India) या आदेशासोबत आपण असमहत असल्याचे म्हणत या पोस्ट आणि अकाऊंट्स पूर्णपणे डिलीट करण्यास एक्सने नकार दिला […]
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनेक नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यात आता खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांचीही भर पडली आहे. खासदार देसाईंचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्याविरोधात ईडीने (ED) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआयने (CBI) तीन आठवड्यांपूर्वी बोभाटे यांच्याविरोधात बेहिशोबी संपत्तीचा गुन्हा दाखल […]