मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचे आणि चिघळलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटत आहे. जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिले आहेत. अशात आता जरांगे पाटील यांना अटक करा आणि त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी […]
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या दहा जागांसाठी आज (27 फेब्रुवारी) मतदान होणार आहे. यासाठी भाजपचे आठ तर समाजवादी पक्षाचे तीन उमेदवार मैदानात आहेत. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे सात तर समाजवादी पक्षाचे तीन उमेदवार निवडूव येऊ शकतात. मात्र भाजपने आठवी जागा जिंकण्यासाठीही जोर लावला आहे. तर समाजवादी पक्षापुढे आमदार फुटण्यापासून वाचविण्याचे मोठे आव्हान आहे. अशातच या […]
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी, त्यांनी केलेल्या आरोपांशी आणि त्यांनी वापरलेल्या भाषेशी आपल्याला काही देणं-घेणं नाही. पण यामागचा बोलवता धनी शोधणार आहे. लाठीचार्जची घटना झाल्यानंतर कोणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या, कोण त्यांना रात्री त्यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यांना रात्री उठवून परत आंदोलनाला कोणी बसवले या सगळ्या गोष्टींचा शोध […]
बारामती : तुम्ही उद्या आम्ही उभा करून त्या खासदाराला विजय केले पाहिजे. तरच मी पुढे विधानसभेला उभा राहील, कारण मी इतके जर काम करून तुम्ही मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडला आहे, मला माझे धंदे पडले आहेत. मी कशाला तुमचे ऐकतोय. त्यामुळे आता आपण काय करायच याचा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, असा […]
मुंबई : युरोपातील देशांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शिंदे सरकारने (Shinde Government) जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या औद्याोगिकदृष्ट्या अतिप्रगत राज्याशी सामंजस्य करार केला आहे. केंद्र सरकारने ना हरकत प्रमाणपत्र प्रदान केल्यानंतर बाडेन बुटेनबर्ग राज्याचा मंत्री गट आणि महाराष्ट्र राज्याचा मंत्री गट यांच्या औपचारिक चर्चा झाली. त्यानंतर काल (रविवारी) मुख्यमंत्री […]
पुणे : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora), माजी मंत्री बाबा सिद्दकी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यानंतर राज्यात काँग्रेसला (Congress) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील (Basavaraj Patil) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसचा ‘हात’ सोडला आहे. येत्या दोन दिवसांत ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची […]
मनोज जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस. हा सामना तसा महाराष्ट्राला नवीन राहिलेला नाही. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मागच्या सहा महिन्यांपासून हा सामना सतत जिवंत ठेवला आहे. या सामन्याची सुरुवात झाली ती सप्टेंबरमध्ये अंतरवाली सराटीमधील उपोषणस्थळी झालेल्या लाठीचार्जनंतर. त्यावेळी त्या घटनेनंतर फडणवीस यांनी पोलिसाची बाजू घेतली. आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज […]
नागपूर : “तुझे काम चांगले नाही. तू कामात कमी पडत आहेस. अनेक ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे” या शेरेबाजीच्या रागातून कनिष्ठ सहकाऱ्याने त्याच्या वरिष्ठ सहकाऱ्याचा चाकू भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये (Nagpur) घडली आहे. एल. देवनाथन एनआर लक्ष्मीनरसिमन (21) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर चंदेल असे संशयित आरोपीचे नाव आहे. दोघेही नागपूर येथील […]
पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, भाजप (BJP) नेते प्रदीप कंद (Pradip Kand) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये कंद राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. कंद यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची बातमी येताच त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण […]
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नाशिकमध्ये (Nashik) मोठे फेरबदल केले आहेत. विजय करंजकर यांच्याजागी आता सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर करंजकर यांची लोकसभा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे करंजकर यांची लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. (In Nashik, Sudhakar […]