मुंबई : राज्याचे बंदर विकास मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि कर्जतचे शिवसेना (Shivsena) आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार राडा झाल्याचे वृत्त आहे. दोघांमध्येही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थोरवे यांनी भुसे यांच्याकडे काही कामांची यादी दिली होती. या कामांबाबत थोरवे यांनी विचारणा केली असता दोघांमध्ये वाद झाला आणि […]
मुंबई : सहकार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात गुंतल्याने राज्य सरकारने जवळपास 40 हजार सहकारी संस्थांच्या (cooperative societies) निवडणुकांना (Elections) 31 मे पर्यंत स्थगिती दिली आहे. काल (29 फेब्रुवारी) विधानभवनात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या निर्णयाचा शासन आदेशही निर्गमित करण्यात आला आहे. केवळ ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा अर्ज […]
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरात (Gujrat) आणि आसामला (Assam) मोठे गिफ्ट दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने टाटा ग्रुपच्या दोन आणि सीजी पॉवर यांच्या एक अशा तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना नुकतीच मान्यता दिली आहे. यातील दोन प्रकल्प गुजरातला तर एक प्रकल्प आसाममध्ये होणार आहे. या तिन्ही प्रकल्पांची एकत्रिक किंमत 126 हजार कोटींच्या घरात […]
2019 ची लोकसभा निवडणूक. भाजप-शिवसेना युतीची सत्ता असतानाही दोन्ही पक्षांचे संबंध तुटेपर्यंत ताणले होते. त्यामुळे शिवसेनेने स्वबळाची भाषा सुरु केली होती. पण भाजपला मात्र शिवसेनेची साथ हवीच होती. त्यासाठी भाजपचे (BJP) चाणक्य अमित शाह (Amit Shah) मातोश्रीवर आले आणि त्यांनी तेव्हाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाशी चर्चा केली. बरीच समजूत काढल्यानंतर शिवसेना भाजपशी […]
रामदेव बाबा. देशातील सुप्रसिद्ध योग गुरु. योगासनाच्या माध्यमातून ते व्यापक स्तरावर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. 2012 साली दिल्लीतील अण्णा हजारे (Anna Hajare) यांच्या आंदोलनानंतर तर त्यांना देशभर कमालीची प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या पतंजली (Patanjali) या संस्थेच्या उत्पादनांची उलाढाल काही हजार कोटींमध्ये असल्याचे सांगितले जाते. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याशी निगडित अनेक गोष्टींचे, वस्तूंचे उत्पादन पतंजलीमध्ये होते. त्यामुळे आज […]
‘विधानसभा अध्यक्ष’ हे एक किती महत्वाचे असते? 2021 मध्ये या पदाचे गांभीर्य ना काँग्रेसला (Congress) समजले ना नाना पटोले (Nana Patole) यांना लक्षात आले. पटोलेंनी अचानक विधानसभेचे अध्यक्षपद सोडले अन् काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर दीड वर्षे अध्यक्षपद रिकामेच राहिले. पण पटोले जर विधानसभेचे अध्यक्ष असते तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करण्याचे धाडसच केले […]
शिमला : पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या आणि सुखविंदरसिंह सुख्खू (sukhvinder sukhu) यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या (Congress) सहा बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पथानिया यांनी दणका दिला आहे. अर्थसंकल्पाला अनुपस्थित राहिल्याने आणि व्हीपचे उल्लंघन केल्याच्या आरोपात या सहाही बंडखोरांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. सुधीर शर्मा, राजेंद्र राणा, रवि ठाकुर, इंद्रदत्त लखनपाल, चैतन्य […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीने जागा वाटप आणि उमेदवारांची नावे जवळपास अंतिम केली आहेत. यातील 13 नावांची संभाव्य यादी ‘लेट्सअप मराठी’च्या हाती लागली आहे. यात काही मतदारसंघांमध्ये अत्यंत धक्कादायक नावे समोर येत आहेत. याठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत भाजप (BJP) नवख्यांना उमेदवारी देण्याच्या तयारी असल्याचे दिसून येते. (BJP-Shiv Sena-Nationalist Congress alliance has finalized the […]
नाशिक : वेरुळच्या जनार्धन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज (Swami Shantigiri Maharaj) यांनी नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एकनाथ रंगमंदिरात जय बाबाजी भक्त परिवार मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. त्यासोबतच औरंगाबादसह आठ लोकसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. […]
शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये सुरु असलेल्या हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्राम्याला 24 तासांनंतर पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू (Sukhwinder Singh Sukhkhu) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प संमत करुन घेत बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे पुढील किमान तीन महिने तरी सुख्खू सरकारविरोधातील संकट टळले आहे. सरकार तरल्यानंतर आता सहा बंडखोर आमदारांविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. या […]