लोकसभेपूर्वी PM मोदींचे गुजरातला मोठे गिफ्ट : टाटा ग्रुप अन् सीजी पॉवरच्या 98 हजार कोटींच्या प्रकल्पाला मान्यता

लोकसभेपूर्वी PM मोदींचे गुजरातला मोठे गिफ्ट : टाटा ग्रुप अन् सीजी पॉवरच्या 98 हजार कोटींच्या प्रकल्पाला मान्यता

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरात (Gujrat) आणि आसामला (Assam) मोठे गिफ्ट दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने टाटा ग्रुपच्या दोन आणि सीजी पॉवर यांच्या एक अशा तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना नुकतीच मान्यता दिली आहे. यातील दोन प्रकल्प गुजरातला तर एक प्रकल्प आसाममध्ये होणार आहे. या तिन्ही प्रकल्पांची एकत्रिक किंमत 126 हजार कोटींच्या घरात आहे. यापैकी गुजरातमध्ये 99 हजार कोटी तर आसाममध्ये 27 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. (Union Cabinet recently approved three semiconductor projects, two by Tata Group and one by CG Power.)

टाटा ग्रुपची टाटा इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेड (TEPL) ही कंपनी तैवानच्या पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्प (PSMC) च्या सहकार्याने गुजरातमधील ढोलेरा येथे सेमीकंडक्टर प्रकल्पाची उभारणी करणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल 91 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पच्या तैवानमध्ये 6 सेमीकंडक्टर फाउंड्री आहेत. याची सुरुवातीची क्षमता दरमहा 50,000 वेफर आहे. एका वेफरमध्ये पाच हजार चिप्स असतात. याशिवाय इलेक्ट्रिक वाहने, टेलिकॉम, डिफेन्स, ऑटोमोटिव्ह, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, डिस्प्ले, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इत्यादींसाठी पॉवर मॅनेजमेंट चिप्स बनवल्या जाणार आहेत.

लोकसभेसाठी भाजपचं ‘मिड नाईट’ डिस्कशन; आज जाहीर होणार उमेदवारांची पहिली लिस्ट

गुजरातमध्ये दुसरा प्रकल्प सीजी पॉवर उभारणार आहे. सीजी पॉवर ही कंपनी Renesas Electronics Japan आणि Stars Micro Electronics थायलंड सोबत सानंदमध्ये 7 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यांची क्षमता दररोज 15 दशलक्ष आहे. टाटा ग्रुपची दुसरी कंपनी टाटा सेमीकंडक्टर असेंबली आणि टेस्ट प्रायव्हेट लिमिटेड आसाममधील मोरिगन प्लांटमध्ये 27 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्लांटची क्षमता दररोज 48 दशलक्ष आहे. यामध्ये ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिक वाहने, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम, मोबाईल फोन इत्यादी विभागांचा समावेश असणार आहे.

अमेरिकेत दोषीला मृत्यूदंड; आठ वेळा हात अन् पायाची नस शोधली पण..,

या निर्णयांबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, ‘पंतप्रधानांनी देशात सेमीकंडक्टर फॅब स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार टाटा ग्रुपच्या दोन आणि सीजी पॉवर यांच्या एक अशा तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना नुकतीच मान्यता दिली आहे.या तीन प्लांटमधून 20 हजार प्रत्यक्ष आणि 60 हजार अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत, असाही दावा सरकारने केला आहे. सोमवारी बाजार बंद होईपर्यंत सीजी पॉवरचा शेअर 4.44 टक्क्यांच्या वाढीसह 448 रुपयांवर बंद झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube