अहमदनगर : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) गोळीबार प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. गायकवाड यांचा फरार चालक रणजीत यादव याला पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर चौकशीमध्ये त्याचे नाव आढळले होते. मात्र तो पोलिसांच्या हाताला लागत नव्हता. त्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे. (Police have arrested Ranjit Yadav, his […]
कोल्हापूर : माझे कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) आहे. मी दहा-पंधरा वर्ष पासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसे जाता येईल त्याकडे माझे लक्ष आहे, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati ) यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीविषयी भाष्य केले. आज (11 फेब्रुवारी) जवळपास नऊ दिवसांच्या अज्ञातवासानंतर ते वाढदिवसानिमित्त सर्वांसमोर आले. त्यावेळी त्यांनी […]
पुणे : ड्रग तस्कर ललित पाटील (Lalit Patil) पळून गेल्याचे प्रकरण अद्याप शांत झालेले नसतानाच ससून रुग्णालयातून आणखी एका आरोपीने पळ काढला आहे. मार्शल लीलाकर असे या आरोपीचे नाव होते. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्या पत्नीला धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर त्याला […]
पुणे : तहसीलदार राधिका बारटक्के यांनी शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची अंमलबजावणी केली नाही. ज्येष्ठ नागरिकांना वारंवार जाणूनबुजून त्रास दिला, असा आरोप करत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी जन अदालतचे अध्यक्ष अॅड.सागर नेवसे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी (District Collector) सुहास दिवसे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे. (Petition to District Collector to dismiss Pune Tehsildar […]
पुणे : अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराची उभारणी करून श्रीरामललांची प्राणप्रतिष्ठापना केली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे अभिनंदन तसेच श्रीरामललांना अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी ‘नमो पुणे अभिवादन’ या भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. उद्या (रविवारी, 11 फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता एरंडवणे भागातील कृष्णसुंदर गार्डन […]
नाशिक : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा रिलायन्स उद्योग समुह (Reliance Industries Group) आता पान पासंद चॉकलेट, चोको क्रीम आणि कॉफी ब्रेक टॉफीचीही विक्री करणार आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने (Reliance Consumer Products) महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असलेली ‘रावळगाव शुगर कंपनी’ (Rawalgaon Sugar Company) खरेदी केली आहे. रिलायन्स कंझ्युमर […]
मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी केलेल्या गोळीबारापासून ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर झालेल्या हल्ल्यापर्यंत गेल्या एक महिन्यात महाराष्ट्रातील घडलेल्या घटना चिंताजनक आहेत. राज्यातले सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे त्यामुळे ते बरखास्त करावे अशी आमची मागणी आहे, असे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज (10 फेब्रुवारी) राज्यपाल रमेश […]
पुणे : आम्ही सूचना देत नाही तोपर्यंत कार्यक्रमस्थळी जाऊ नका, असे निखिल वागळे यांना सांगितले होते. पण त्यानंतरही ते आमच्या सल्ल्याविरुद्ध घटनास्थळी रवाना झाले आणि पोलिसांना चुकवून प्रत्यक्षात मार्ग बदलला, असे म्हणत पुणे पोलिसांनी (Pune Police) ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे खापर त्यांच्यावरच फोडले. तसेच पुणे पोलिसांवर झालेल्या टीकेनंतर पोलिसांनी वागळे […]
मुंबई : उद्धवजींची भाषा आणि शब्द ऐकल्यानंतर माझे ठाम मत आहे की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticizes Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party chief Uddhav […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात Citizenship Amendment Act लागू करण्यात येईल, आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी त्याबाबतची अधिसूचना जारी केली जाईल, अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतमीध्ये शहा यांनी ही घोषणा केली. (Amit Shah has announced that the Citizenship Amendment Act […]