पुणे : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad) या शहरांची नामांतर प्रक्रिया पूर्ण होऊन आता सरकारी दफ्तरी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन नवीन नावांनी ही शहरे ओळखली जात आहेत. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of india) या नामांतराची दखल घेण्यास नकार दिला आहे. परिसीमन आयोगाच्या निर्णयानुसार शहराच्या नावात बदल करण्याची आवश्यकता नाही, असे सांगून […]
पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे आणि इतर पुरोगामी कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणात 250 ते 300 कार्यकर्त्यांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. यातील पहिला गुन्हा हल्ला करणाऱ्या भाजपच्या (BJP) शहाराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्यासह 43 आंदोलकांवर दाखल झाला आहे. तर ‘निर्भया बनो’ सभेचे आयोजक, निखील वागळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब […]
पुणे : भाजपचे आक्रमक कार्यकर्ते, काही गुंड अन् लक्ष्य होते निखील वागळेंची गाडी. पुण्याच्या (Pune) रस्त्यावर शुक्रवारी रात्री ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagale), सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Choudhari) आणि अॅड. असीम सरोदे या पुरोगामी कार्यकर्त्यांवर झालेला संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला. आधी प्रभात रोडवरील इराणी कॅफेजवळ, मग गरवारे कॉलेजच्या पुढे त्यानंतर सेनादत्त पोलीस […]
पुणे : येथील एका व्यावसायिकाची आसाममधील गुवाहाटी (Guwahati) शहरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुवाहाटी पोलिसांनी (Police) तरुणीसह दोघांना अटक केली आहे. संदीप सुरेश कांबळे (44, रा. येरवडा) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. तर अंजली शॉ आणि विकासकुमार शॉ असे अटक केलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. (A businessman […]
मुंबई : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद ताजा असतानाच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (chhagan Bhujbal) यांना पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुम्हाला उडवण्यासाठी पाच जणांनी 50 लाखांची सुपारी घेतली आहे, सावध राहा, अशा आशयाचा धमकी वजा इशारा या पत्रात देण्यात आला आहे. भुजबळ यांना यापूर्वीही ब्राह्मणविरोधी […]
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. मॉरिस (Mumbai News) नारोन्हा उर्फ मॉरिस भाई याचा मागील तीन ते चार महिन्यांपासून बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या अमरेंद्र मिश्रा याला अटक केली आहे. त्याच्याच बंदुकीने मॉरिस […]
मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पुण्यात गुंड शरद मोहोळ याची दिवसाढवळ्या झालेली हत्या, भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच केलेला गोळीबार, शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची झालेली हत्या, गुंडांचे वाढलेले धाडस, गुंड आणि राजकीय नेत्यांचे संबंध अशा […]
पुणे : आज माझ्यावर झालेल्या हल्ल्याला केवळ पुणे पोलीस जबाबदार आहेत. त्यांना हल्ला होणार हे माहिती होते. मात्र त्यानंतरही त्यांनी सिनेमातील पोलिसांसारखी केवळ बघ्याची भूमिका घेतली. महाराष्ट्राचे पोलीस दल भाजपने (BJP) विकत घेतले आहे, असा गंभीर आरोप करत ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांनी आज (9 फेब्रुवारी) निर्भय बनो सभेतून भाजप आणि पोलिसांवर सडकून […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 2015 मध्ये अचानक पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaj Shareef) यांच्या नातीच्या लग्नाला कसे पोहचले होते? या प्रश्नाचे उत्तर अखेरीस देशाला मिळाले आहे. आज (9 फेब्रुवारी) दुपारच्यावेळी संसदेच्या कॅन्टिनमध्ये जेवण करताना याबाबतचा किस्सा उपस्थित आठ खासदारांसह सर्वांना सांगितला. (Prime Minister Narendra Modi had lunch with MPs in […]
मिरज : पतीसोबत भांडण झाल्यानंतर सासर सोडून कराडला जाणाऱ्या आणि चुकून मिरजला पोहचलेल्या 23 वर्षीय विवाहितेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा, त्यानंतर तिला लग्नासाठी कर्नाटकात नेऊन तिची चार लाखांत विक्री केल्याचा आणि परस्पर लग्न लावून दिल्याचा अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार उघड झाला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात […]