“छगन भुजबळांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर हाकला, छगन भुजबळांना विरोध करु नका म्हणून सांगा…” शिवसेनेतील आमदार आणि मंत्री, विरोधी पक्षातील आमदार आणि सकल मराठा समाज मागील काही दिवसांपासून याच आशयाची मागणी करत आहे. मराठा आरक्षणाला विरोध करत भुजबळांनी आपल्याच सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. आपल्याच सरकारविरोधात ते सभा घेऊन जाहीरपणे इशारा देत आहेत. […]
पुरंदर : तहसिलदार कार्यालयातून ईव्हीएम मशीनचे (EVM Machine) कंट्रोल युनिट चोरीला गेल्याच्या प्रकाराची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगाने पुरंदरचे प्रांताधिकारी, तहसिलदार आणि पोलीस उपाधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांच्याकडे सुरक्षेतील त्रुटींबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबत संपूर्ण अहवाल 12 फेब्रुवारीपर्यंत […]
“अकेला देवेंद्र क्या करेगा, मिळालं का उत्तर?, काका म्हणायचे 105 घरी बसवले… पण त्यांनाच कधी घरी बसवले कळले नाही, मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस शाळेत होते… पण त्याच फडणवीसांनी चाणाक्ष बुद्धीने तुमच्या राजकीय कारकिर्दीला शेवटचा खिळा ठोकला आहे… ” अशा आशयाच्या शेकडो पोस्ट कालपासून भाजप कार्यकर्त्यांच्या आणि भक्तांच्या फेसबुक वॉलवर पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस […]
मुंबई : काल सरकारचे बाळराजे कोठे होते? त्यांच्या खास गँग बरोबर सुलतानपूर रिसॉर्ट मध्ये साग्र संगीत बरेच काही करीत होते.. या राज्याचे कठीण आहे, असे म्हणत शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. याच ट्विटमध्ये राऊत यांनी […]
थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. गत महिन्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इथे रोड शो केला होता. त्यापाठोपाठ ठाकरे गटाने इथे मेळावा घेत नाशिकवर लक्ष असल्याचा संदेश दिला. सध्या महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचीही […]
पुणे : “कोणत्याही राजकीय नेत्याला भेटायचे नाही, राजकीय नेत्यांसोबतच्या जुन्या भेटींचे फोटो व्हायरल करायचे नाहीत, रिल्स करायचे नाहीत. दहशत निर्माण होईल अशा आशयाचे स्टेटस टाकायचे नाहीत. गुन्ह्याचे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करायचे नाही. ए घायवळ, ए मारणे… सांगितलेल्या सूचना समजल्या का? अशा दमदाटीच्या भाषेतच पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नामचिन गुंडांना दम भरला. नवीन पोलीस […]
मुंबई : महायुती सरकार राज्यातील गुंडांना अभय देत असून सरकारच्या मेहेरबानीने हे गुंड राजरोस फिरत आहेत. जामिनावर सुटलेला गुंड निलेश घायवाळ मुख्यमंत्र्यांना भेटतो. मंत्रालयात बिनधास्त फिरतो. मंत्रालयात रिल्स बनवतो. सामान्य माणूस मात्र रांगेत उभा असतो. यालाच म्हणायचे का अच्छे दिन असा, सवाल करत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी गुंडांना राजाश्रय मिळत असल्याचा […]
कलम 370 हटविले, राम मंदिर उभारले… आता राहिला समान नागरी कायदा (Uniform Civil Code). भाजपने (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेत येण्यापूर्वी जाहीरनाम्यात दिलेली तीन प्रमुख आश्वासने आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. समान नागरी कायद्याबाबत सध्या मोदी सरकारच्या मोठ्या हालचाली सुरु आहेत. मात्र हा कायदा संपूर्ण देशात लागू करण्यापूर्वी मोदी सरकार उत्तराखंडमध्ये […]
उत्तराखंडमध्ये भाजप, हरियाणामध्ये भाजप, राजस्थानमध्ये भाजप, मध्यप्रदेशमध्ये भाजप, छत्तीसगडमध्ये भाजप, उत्तर प्रदेशमध्ये भाजप, बिहारमध्येही भाजपच. उत्तर भारतात हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही. यातील हिमाचल प्रदेशमध्ये पूर्ण बहुमताने काँग्रेस (Congress) सत्तेत आहे. पंजाब (Punjab) आणि दिल्लीमध्ये पूर्ण बहुमताने आम आदमी पक्ष सत्तेत आहे. तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या […]
मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. सरकारने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत सगेसोयरे अधिसूचना जारी केली. त्यानंतर तर ओबीसी नेते आणि संघटना अधिकच आक्रमक झाल्या आहेत. मराठा समाजानेही या अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशात ओबीसी (OBC) नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी […]